भांडवलशाही अर्थव्यवस्था
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.[१]
वैशिष्ट्ये
संपादन- उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे.
- उद्योग - व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात.
- ग्राहक हे " सार्वभौम " असतात, कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात.
- बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.
- येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.
दोष
संपादन- आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते.
- जास्तीत जास्त नफा कमविणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी,बेरोजगारी,कामगार कल्याण,पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही.
- चैनीच्या व निम - चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो.
- अशा अर्थव्यवस्थेत तेजी - मंदीची व्यापारचक्रे येत असतात.तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदीदरम्यान बेरोजगारीत वाढ होते.[२]