Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.


व्यापार चक्र हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे अंग आहे. या मध्ये सरकारी हस्तक्षेप कमी असतो. उपभोक्त आणि उत्पादक यांना स्वातंत्र्य असते. ही अर्थव्यवस्था बाजार यंत्रणे वर आधारित असते. यामुळे अशा अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहारत सतत चढ-उतार होतात. अर्थव्यवस्थेतील चक्राकार पद्धतीने घडून येणारे बदल म्हणजे व्यापार चक्र होय. मिश्र अर्थव्यवस्थेत ही चढ-उतार होतात.पण साम्यवादी अर्थव्यवस्थेत असे बदल जाणवत नाहीत.हे बदल तेजी-घसरण-मंदी-पुनरुज्जीवन स्वरूपात असतात. त्याच बरोबर या बदलांच कालावधी निश्चित नसतो. काही व्यापार चक्रे अल्प मुदतीची असतात,तर काहींचा कालावधी मोठा असतो. या बदलांचे बहुतेक सर्वच क्षेत्रावर परिणाम होतात.[१] व्यापार चक्रामुळे एकूण रोजगार, एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन आणि एकूण रोजगार पातळी इत्यादी मध्ये लाटांसारखे चढ-उतार घडून येतात. चक्रीय बदल एका क्षेत्रात सुरु होऊन अन्य क्षेत्रात विस्तार होतो. व्यापार व्यापार चक्राचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असते.

व्यापारचक्राचा मागोवा 

फ्रेंच अर्थतज्ज्ञ क्लेमेंट जगलर याचा खास व्यापारचक्रावरील पहिला ग्रंथ १८६० साली प्रसिद्ध केला. त्यात व्यापारचक्राच्या त्यांनी तीन अवस्था दर्शविलेल्या होत्या. आर्थिक भरभराट (प्रॉस्पेरिटी), आर्थिक घसरण (रिसेशन) आणि आर्थिक अरिष्ट अगर दिवाळखोरी (डिप्रेशन) अवस्था. या तीन अवस्था क्रमशः एकापाठोपाठ एक अशा येत असतात. आर्थिक अरिष्टे चक्री आंदोलनाचा भाग असतात, हे प्रथम ज्यांना उमगले, त्यांत जगलरचा समावेश होतो. आर्थिक भरभराटीतच विघटनाची बीजे रोवली जातात, त्यांतूनच मंदी उदभवते, तसेच किमतींमधील कालानुसारी फेरबदल यांसारख्या बाबींच्या मुळाशी व्यापारचक्राची संकल्पना आहे, असे जगलरचे निदान होते.[२]

व्यापारचक्रांचा  सैद्धांतिक अभ्यास करणारे अर्थतज्ज्ञ 

विल्यम स्टॅन्ली, जेव्हन्झ हायेक, अ‍ॅल्फ्रेड मार्शल,  कार्ल मार्क्स,  डेव्हिड रिकार्डो,  जोझेफ शुंपेटर,  नट विकसेल, जे.एम केन्स,  जॉन हिक्स रिचर्ड, बेस्ली क्लेअर मिचेल इत्यादी.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ स्थूल अर्थशास्त्र, दामाजी आणि भोसले काटे, फडके प्रकाशन जून २००९, पान ८६ 
  2. ^ मराठी विश्वकोश, खंड १७