भरतकुमार राऊत

भारतीय राजकारणी
(भरतकुमार राउत या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतकुमार राऊत (६ एप्रिल, १९५३) हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. [] ते ४ दशकांहून अधिक काळ राज्यसभेत होते. त्यांनी अनेक इंग्लिश आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तसेच सरकारी आणि खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांसाठी देश-विदेशात पत्रकारिता केली आहे.

त्यांनी महाराष्ट्र टाईम्सचे संपादक, टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपचे सल्लागार आणि लोकमत मिडिया ग्रुपचे संपादकीय दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सुरुवातीचे जीवन

संपादन

राऊत यांचा जन्म महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. त्यांचे शालेय जीवन मुंबई येथे झाले. राज्यशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी वृत्तपत्र पत्रकारितेमध्ये मध्ये काम करण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये दूरदर्शन ही सरकारी वाहिनी घोषित झाल्यावर लगेचच त्यांनी दूरचित्रवाणीमध्ये काम करण्याचे ठरविले.

शिक्षण

संपादन

राऊत यांनी मुंबई विद्यापीठामधून एम.ए.चे शिक्षण पूर्ण केलं. त्याचप्रमाणे त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून पी.एचडी पूर्ण केली.

कारकीर्द

संपादन

त्यांनी मराठी आणि त्यानंतर इंग्लिश वृत्तनिवेदक म्हणून पाच वर्षे काम केले. [] दूरदर्शनमध्ये त्यांनी बातम्यांवर आधारित अनेक कार्यक्रम, चर्चासत्रे केले. त्यांनी शेख मुजिबुर रहमान, जागतिक बँकेचे रॉबर्ट मॅकनॅमरा यांसारख्या व्यक्तींच्या मुलाखतीही घेतल्या.[]

त्यानंतर त्यांनी टाइम्स वृत्तसमूहामध्ये दाखल झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून काम पहिले. ते महाराष्ट्र टाइम्सचे संपादक असताना हे वृत्तपत्र मुंबई महानगरीय भागातील सर्वोच्च खपाचे मराठी दैनिक बनले.[] राऊत यांनी द पायोनियर या वृत्तपत्राचे निवासी संपादक म्हणून देखील काम पहिले.[]

१९९६ साली झी टीव्ही नेटवर्कच्या उभारणीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. झी नेटवर्कमध्ये क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत असताना परदेशात झी नेटवर्कच्या बांधणीसाठी त्यांनी युरोप व अमेरिकेमध्ये बराच प्रवास केला.[]

ते १९८७-८८ साली मुंबई पत्रकार संघा या मराठी भाषिक पत्रकारांच्या संघटनेचे अध्यक्ष होते.[]

पुस्तके []

संपादन
पुस्तक भाषा प्रकाशन वर्ष
अंधारातील प्रकाश मराठी १९७७
दृष्टिकोन मराठी २००७
नायक मराठी २००४
शिवसेना:हार आणि प्रहार मराठी २००५
असा दृष्टिकोन मराठी २००६
अशी ही मुंबई मराठी २००८
मनोवेध मराठी २०१०
गीता: आनंद यात्रा मराठी २०११
पास्ट फॉरवर्ड (इंटरनेट आवृत्ती) इंग्रजी २०११
स्मरण मराठी २०१५

पुरस्कार

संपादन
  1. ^ a b "संग्रहित प्रत". 2016-02-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e f "संग्रहित प्रत". 2016-06-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-06-07 रोजी पाहिले.