बौद्ध संगीती
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’ (‘संगीती’) असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. या परिषदांचा मुख्य उद्देश बौद्ध ग्रंथनिश्चिती वा ग्रंथनिर्मीती हा होता.[१]
बौद्ध परिषदेची यादी आणि अनुक्रम हा बौद्ध संप्रदायानुसार वेगवेगळा असू शकतो. बौद्ध धर्मावरील पश्चिमात्य ग्रंथांत आलेल्या नोंदींनुसार संगीतींची यादी, अनुक्रम, वर्ष व स्थळ पुढीलप्रमाणे आहे.
- पहिली बौद्ध संगीती — इ.स.पू. ४८३, राजगीर (राजगृह).
- दुसरी बौद्ध संगीती — इ.स.पू. ३८७, वैशाली.
- तिसरी बौद्ध संगीती — इ.स.पू. २४०, पाटलीपुत्र.
- चौथी बौद्ध संगीती — [[, [कुंडलवन काश्मीर येथे सम्राट कनिष्क काळात,वसुमित्रचा अध्यक्षतेखाली झाली]] राज्य.
- पाचवी बौद्ध संगीती — इ.स. ५७, गांधार ,काश्मीर. (थेरवाद बौद्ध संगीती – इ.स. १८७१)
- सहावी बौद्ध संगीती — इ.स. १५७, गांधार.(थेरवाद बौद्ध संगीती – इ.स. १९५४, रंगून)
पहिली बौद्ध संगीती
संपादनबौद्ध ग्रंथांनुसार गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच १०० दिवसानी पहिल्या बौद्ध संगीतीचे आयोजन झाले होते.[२] अजातशत्रू राजाच्या मदतीने महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली राजगृहात (आजचे राजगीर) सप्प्तपंथी गुहांमध्ये पहिल्या धम्म संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. संगीती साठी ५०० अर्हंताची निवड करण्यात आलि होती. ४९९ अर्हंत होते भिक्खु आनंदाला संगीतीच्या आधी अर्हत पद प्राप्त झाल्या नंतर संगीतीत समावेश करण्यात आला. बुद्धांची शिकवण (सुत्त) आणि संघाची शिस्त किंवा नियम (विनय) यांचे जतन करणे हा तिचा उद्देश होता. आनंद सुत्त पठन करत होते व सर्व अर्हंत त्याचे सम्पादन करित होते अशा तऱ्हेने सुत्त पिट्का चि निर्मिति झालि. तर उपाली विनय पठन करत होते व सर्व अर्हंत त्याचे सम्पादन करित होते अशा तऱ्हेने विनय पिट्का चि निर्मिति झालि. काही स्रोतांच्या मते, संगीतीत अभिधम्म पिटक किंवा त्याच्या मॅटिकाला देखील सामावून घेतले होते. या पहिल्या संगीतीत संघाने विनयच्या सर्व नियमांचे- अगदी लहानात लहान नियमांचे- पालन करण्याचा सर्वसमावेशक निर्णय घेतला होता.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ बौद्ध परिषदा
- ^ Prebish, Charles S. (2008), "Cooking the Buddhist Books: The Implications of the New Dating of the Buddha for the History of Early Indian Buddhism" (PDF), Journal of Buddhist Ethics 15, 1–21