बोरगाव (कर्जत)
बोरगाव हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील उल्हास नदीची उपनदी असलेल्या पोसरी नदीच्या काठावरील निसर्गसौंदर्याने नटलेले गाव आहे. गावाच्या पश्चिमेस, गावातील लोकांच्या श्रमदानाने तयार झालेल्या कळंब-बोरगाव ह्या तीन मैलांच्या रस्त्याच्या कडेला, वेशीजवळ, गावाचे ग्रामदैवत टाकोबाचे देऊळ आहे. देवळात गणपती, तसेच घोड्यावर स्वार असलेले टाकोबा यांची दगडावर कोरलेली शिल्पे आहेत. गावकऱ्यांच्या परंपरागत समजुतीनुसार टाकोबा घोड्यावर स्वार होऊन गावाचे रक्षण करतात. गावाच्या पूर्वेस मारुतीचे मंदिर आहे, दरवर्षी हनुमान जयंतीला मारुतीची पालखीतून मिरवणूक काढली जाते.
?बोरगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कर्जत |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनअलीकडेच ह्या गावात तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीची वाडी, आणि उंबरमाळ या पाच आदिवासी वस्ती असलेल्या वाड्यांचा समावेश केला आहे.ह्या वाड्यात राहणाऱ्या सुमारे ४३५ ग्रामस्थांनी प्रथमच रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान हक्क बजावला.<refमहाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ९ मे २०२४</ref>
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनह्या गावात अद्यापही काही ठिकाणी पाणी, वीज, रस्ते सारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.[१]
जवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन- व्हिलेजइन्फो.इन
- सेन्सस२०११.को.इन
- टूरिझम.गव्ह.इन
- .https://www.incredibleindia.org/
- .https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- मॅप्सऑफइंडिया.कॉम
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ९ मे २०२४