बोपदेव
भारतीय कवी, व्याकरणकार, ज्योतिषी
बोपदेव हे देवगिरीच्या यादवांच्या दरबारातील एक मान्यवर दरबारी म्हणून प्रसिद्ध होते. ते मूळ विदर्भातील वेदपद या गावचे प्रसिद्ध कवी, वैद्य आणि व्याकरणकार होते. त्यांनी व्याकरणावर दहा, वैद्यकावर नऊ, ज्योतिषावर एक, साहित्यशास्त्रावर तीन व भागवतावर तीन असे सव्वीस प्रबंध लिहिल्याचे हेमाद्रि यांच्या साहित्यात उल्लेख आहेत. बोपदेव हा हेमाद्रि यांचा मित्र होता. भागवतपुराणाचे कर्तृत्त्व बोपदेव यांच्याकडे जाते.[१]
भारतीय कवी, व्याकरणकार, ज्योतिषी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. ११५० अमरावती | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | इ.स. १२४० | ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
बोपदेवांची मुक्ताफल आणि हरिलीला या दोन ग्रंथाची निर्मिती विशेष मानली जाते. हरिलीला या ग्रंथात भागवताचा ग्रंथसारांश आहे. हेमाद्रि पंडितांचा त्यांनी सारथि असा उल्लेख केला आहे. विदर्भातील सार्थ हे गाव बोपदेवचे असावे असेही म्हणले जाते. बोपदेव व्याकरणप्रणालीचा प्रवर्तक मानला जातो. [२]
मराठीतील भाष्यग्रंथांची सुरुवात बोपदेवाने केली.