हेमाद्रि पंडित

(हेमाद्रि या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतातील महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात इ.स. १२६० ते इ.स. १३०९ हेमाद्रि पंडित (उपनाव- हेमाडपंत) हे प्रधान होते. त्यांनी मोडी लिपीचा वापर सुरू केला असे मानले जाते. त्यांनी, त्याकाळी अनेक देवळांच्या बांधकामात एक खास अशी शैली वापरली. या पद्धतीच्या मंदिरांना हेमाडपंती प्रकारातले मंदिर असे म्हणतात. यांनी हेमाद्रिव्रत हे व्रतांची माहिती असलेला ग्रंध रचला.

मतांतरे

संपादन

हेमाड्पंत ही उपाधी असून यादव कालापेक्षा जुनी आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी येथील मधुकेश्वर देवालय हे जखनाचार्य या हेमाड्पंतानी बांधले होते असा संदर्भ मिळतो.