भारतीय साहित्यशास्त्र
(साहित्यशास्त्र या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
साहित्याचे स्वरुप
संपादनसाहित्याच्या स्वरूपाचा विचार करणारे प्राचीन भारतीय साहित्यशास्त्र हे काव्यशास्त्र ह्या संबोधनाने ओळखले जाते. साहित्याचे आत्मत्त्व सांगणाऱ्या वेगवेगळ्या सिद्धांतानी आपापल्या धारणानुसार साहित्याची व्याख्या करण्याचा म्हणजेच साहित्याचे व्यवच्छेदक आत्मतत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्याची व्याख्या करण्याचे अनेक प्रयत्न संस्कृत व पाश्चात्य साहित्यपरंपरेत झालेले आहेत. साहित्याची व्याख्या जरी निश्चित करता येत नसली तरी वेगवेगळ्या साहित्यप्रकारात आढळणारे जे गुणविशेष आहेत, त्या गुणविशेषांवर मात्र ह्या वेगवेगळ्या सिद्धांतानी प्रकाश पडतो.
साहित्याच्या व्याख्येचे प्रयत्न : संस्कृत परंपरा
संपादनसंस्कृत परंपरेत वक्रोक्ती, अलंकार, रीती, औचित्य, ध्वनी व रस अशा काही वेगवेगळ्या तत्त्वांना प्राधान्य देण्यात आले. ह्या परंपरेत साहित्यविषयक वेगवेगळ्या भूमिकाना दृष्टिकोन निर्माण झाले.
- वक्रोक्ती: संस्कृत साहित्यशास्त्रातील विवेचन हे नाट्याच्या संदर्भातील होते. काव्यचर्चा नंतरच्या काळात निर्माण झाली. नाटकात नाट्यधर्मीमुळे सौंदर्य निर्माण होते. काव्यातील सोंदर्याचा विचार करताना वक्रोक्ती या तत्त्वाचा पुरस्कार करण्यात आला. भामहाने वक्रोक्तीमुळे काव्याचे विभावन होते तर कुंतकाने वक्रोक्ताी हे काव्याचे जीवन मानले आहे. त्याच्या मते विदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती म्हणजे वक्रोक्ती होय.
- अलंकार: (अभिनवगुप्त) संस्कृत परंपरेतील एक महत्त्वाचे काव्यतत्त्व आहे. ज्यायोगे काव्याला शोभा येते, वेगेपणा प्राप्त होतो, सौंदर्य प्राप्त होते, तो अलंकार. ह्या व्यापक अर्थाने ही संज्ञा वापरली गेली. परंतु अलंकार म्हणजे कोणत्या प्रकारच्या शब्दांची व अर्थाची रचना अभिप्रेत आ्रहे, तर सौंदर्य निर्माण करणारी वैशिष्ट्यपूर्ण अशी शब्दार्थयोजना.
- रीती: रीतीःआत्मा काव्यस् वामनाने काव्याचे आत्मत्त्व म्हणून रीतितत्त्वाचा पुरस्कार केला. गुणांनी युक्त अशी विशिष्ट प्रकारची पदरचना म्हणजे रीती आणि पदरचना म्हणजे शब्दार्थांची सौंदर्पूर्ण योजना होय. पदरचनेचा विचार करताना वामन ज्या गुणांचा विचार करतो ते केवळ शब्दांपुरतेच मर्यादित नाहीत. गुणांचा संबंध अर्ताशी व आशयाशीही येत असतो. या गुणांच्या अुरोधानेच रीतीचे स्वरूप ठरते. माधुर्य, प्रसाद, ओज आदी गुणांचा विचार करताना लक्षात येते की, भावकवितांबाबत आपण जसा गुणांच्या परिभाषेत सहजपणे व स्वाभाविकपणे विचार करतो, तसा तो निवेदनात्मक साहित्यप्रकारांबाबत करत नाही.
- ध्वनी: (आनंदवर्धन) ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे, हे आनंदवर्धनाचे मत विवादास्पद आहे. व्यंजनाशक्तीमुळे शब्दांच्या वाच्यार्ताहून वेगळाच असा जे अर्थ (रमणीय) सूचित होतो. तोच व्यंगार्थ किंवा ध्वन्यर्थ होय. आनंदवर्धनाच्या मते, या व्यंगार्थामुळे रसप्रतीती येते. त्यामुळे ध्वनी हा काव्याचा आत्मा ठरतो. परंतु यावर आक्षेप असा आहे की, सर्वच काव्यातून अर्थ ध्वनित होतो असे नाही, पण तरीही ती रसपूर्ण काव्ये असतात.
- औचित्य: (क्षेमेन्द्र) औचित्य हे रसाचे म्हणजे पर्यायाने सौंदर्याचे जीवित आहे, असे क्षेमेंद्राने मानले आहे. औचित्य म्हणजे रसाचा उत्कर्ष साधणारी शब्दालंकाराची योजना होय. वस्तू सुंदर असूनही तिची योजना अयोग्य ठिकाणी किंवा अयोग्य पद्धतीने केली असता, सौंदर्यहानी होते. अनौचित्यामुळे रसभंग होतो. औचित्य हे तत्त्व शब्द व अर्थ ह्यांना लागू पडणारे आहे हे खरे परंतु, जीवनातील व्यवहारात्मकतेच्या सर्वच क्षेत्रात प्रस्तुत ठरणारे असे तत्त्व आहे. ते केवळ काव्यापुरतेच मर्यादित नाही.
- रस: (विश्वनाथ) वाक्यम रसात्मक काव्यम् संस्कृत साहित्यपरंपरेत सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेले काव्याचे व्यवच्छेदक तत्त्व म्हणजे रस होय. काव्यवाचनामुळे रसिकाला जी अलौकिक अनुभूती येते ती म्हणजे रस, असे विश्वनाथाचे मत होते. परंतु शोकात्म घटक ज्यात प्रबावी आहे. अशा अन्य साहित्य प३कारांतील कृतीचा आपल्याला येणारा समग्र प्रत्ययहा आनंदमय स्वरूपाचा असतो का? तसे नसेल तर रस हे काव्याचे प्रणभूत तत्त्व म्हणून स्वीकारता येणार नाही.
साहित्याच्या व्याख्येचे प्रयत्न : पाश्चात्य परंपरा
संपादनसाहित्याची व्याख्या देण्याचे पाश्चात्य साहित्यपरंपरेत प्रयत्न झाले. त्यांचा विचार १) अनुृकृतिवादी २) आविष्कारवादी ३) रूपवादी ह्या तीन सिद्धांताच्या आधाराने करता येते.
साहित्याच्या व्याख्येचे प्रयत्न : आधुनिक परंपरा
संपादनसाहित्यकृतीचाी सात अंगे
संपादनसाहित्य, काव्य ही एक व्यामिश्र, अनेकांगी घटना आहे. या व्यामिश्र घटनेच्या कोणत्या अंगावर भर द्यायचा यावरून साहित्यात वेगवेगळे संप्रदाय वा सिद्धांन्त निर्माण झाले आहेत. साहित्यकृतीच्या संदर्भात अनेक अंग प्रस्तुत असताना एक व दोन अंगावर भर देऊन साहित्याची जी व्याख्या केली जाते ती नेहमीच अपुरी, एकांगी राहाते. साहित्याची, काव्याची एकच एक व्याख्या देता येत नसली तरी साहित्याच्या स्वरूपाची चर्चा करताना आपल्याला त्यांची अनेक अंगे विचारात घ्यावी लागतात. प्रा. गंगाधर पाटील यांनी साहित्यकृतीचे स्वरूप अनेकांगी असते हे लक्षात घेऊन साहित्यकृतीची सात अंगे सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे - १.भाषिक अंग' - साहित्यकृती शब्दांनी युक्त, या शब्दांचे ध्वनिरुप, अर्थरुप, वाक्यविन्यासात्मक अंग २.आशयात्मक अंग' - शब्द अर्थयुक्त, साहित्यकृतीतील आशय मानसिक, आंतरिक, सामाजिक-राजकीय असा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. ३.'रुपबंधात्मक/संरचनात्मक अंग' - शब्द, वाक्य, प्रतिमा, बंध, कथाबीज, कथानर, पात्रे आदी घटकांनी मिळून साहित्यकृती संघटित होते. ही सेंद्रिय एकात्मता असते. ४.'कल्पकतेचे अंग' - साहित्यकृतीतील पात्रे, घटना, कथानक हे घटक एक कल्पित विश्व निर्माण करतात. हे कल्पितविश्व प्रत्यक्ष जीवनाची अनुकृती असेल वा नसेल. ५.'प्रकारात्मक अंग' - साहित्यकृती कथा, कादंबरी, कविता अशा कोणत्यातरी प्रकारात सामावते. त्या साहित्यप्रकाराची वेगळी वैशिष्ट्ये असतात. ६.'कलात्मक अंग' - साहित्यकृतीचे साहित्यपण, कलापण कोणत्यातरी घटकात असते. उदा. रस, असंकार, ध्वनी इ. ७.'सत्ताशास्त्रीय अंग' - प्रत्येक साहित्यकृतीत एक अस्तित्त्व असते. साहित्याचे अस्तित्त्व भौतिक नाही, ते वेगळेच असते.
साहित्याेच माध्यम
संपादनसाहित्याचा घाट
संपादनसाहित्याचे प्रयोजन
संपादनसाहित्याची निर्मिती व आस्वाद यांमधील कल्पनाशक्तीचे कार्य
संपादनसाहित्याची भाषा व शैलीविचार
संपादनआधुनिक भाषावैज्ञानिकांनी भाषेविषयीचे आदेशात्मक दृष्टिकोण नाकारले. त्याऐवजी त्यांनी भाषा प्रत्यक्षात कशी वापरली जाते याचे वस्तुनिष्ठ व काटेकोर वर्णन करणे हे भाषाविज्ञानाचे कार्य मानले.
साहित्याचे प्रकार, वर्गीकरणाचे तत्त्व
संपादनसंदर्भसूची
संपादन- ^ केतकर, व्यंकटेश. "साहित्यशास्त्र". केळकर ज्ञानकोश.
- ^ यशवंत, मनोहर. "साहित्यशास्त्र" (PDF). yashwantmanohar.com.
- ^ श्री. वसंत पाटणकर यांनी दूरस्थशिक्षण अभ्यासक्रमासाठी लिहिलेले पुस्तक