बिटकॉईन
बिटकॉईन हे एक डिजिटल चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते. ऑगस्ट २०१३ अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती. हे एक आभासी चलन आहे. अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही. बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे, विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन द्वारा व्यवहार करता येतात, बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही, व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत, मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइनचा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो. प्रत्येक देशाचे एक चलन असते. आपल्या देशाची करन्सी म्हणजेच चलन रुपया आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या देशांच्याही करन्सी असतात आणि ही करन्सी त्या देशातील केंद्रीय बँकेद्वारे रेग्युलेट होत असते. या उलट बिट कॉईन कोणत्याही एका देशाची करन्सी नाही. ही एक डिजीटल करन्सी आहे. ही करन्सी कोणत्या एका देशासाठी नसते. याला क्रिप्टोकरन्सी म्हणतात. ही क्रिप्टोग्राफीसाठी वापरली जाते. या करन्सीला डिजीटल पद्धतीने बनवण्यात आलेआहे. याच्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो. याची ट्रेडिंगही होते. हे विकून पैसेही कमावता येतात. काही देशांनी ह्या संख्यात्मक चलनावर पूर्ण बंदीच आणली आहे, तर काहींनी दुसऱ्या टोकाला जाऊन ह्या व्यवहारांना मान्यता दिली आहे. पण ह्याहूनही मोठी भीती आहे ती गुन्हेगारी जगतात ह्या संख्यात्मक चलनाचा वापर हे चलन कोणाकडे व किती आहे ह्याच्या गुप्ततेमुळे गुन्हेगारी, ड्रग्ज माफिया, आतंकवादी ह्यांना मोठमोठे धन एका देशातून दुसऱ्या देशात पाठवण्यास व त्याचे वाटप करण्यात नक्कीच सुविधा होईल. आज अशा पैशाचे रूपांतर सोने, हिरे किंवा नकद ह्या स्वरूपात असेल, पण संख्यात्मक चलन हे गुणात्मक इतके सरस आहे की कदाचित त्यामुळे भविष्यात सोन्याची मागणी कमी होऊन त्याचे भाव गडगडतील. पण त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारतासारख्या देशातील उद्योगांना पैसा उभा करायचा असेल तर ह्याच चलनाचे बाँड करून कोणत्याही जाचक अटी-नियमांशिवाय सोपा मार्ग सापडेल. बिटकॉइनची म्हणजेच संख्यात्मक चलनाची ही क्रांती इतर क्रांतींप्रमाणेच दुधारी आहे. शेवटी आपण ती कशी वापरणार ह्याने ते चलन चांगले की वाईट हे समजेल.
digital cash system and associated currency | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | मुक्त आज्ञावली, communication protocol, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, payment system (युरोपियन मध्यवर्ती बँक, disputed), चलन (युरोपियन मध्यवर्ती बँक, disputed), reserve currency (युरोपियन मध्यवर्ती बँक, disputed), crypto asset (युरोपियन मध्यवर्ती बँक), क्रिप्टोकरन्सी (युरोपियन मध्यवर्ती बँक, disputed) | ||
---|---|---|---|
उपवर्ग | legal tender (एल साल्वादोर), भांडवली गुंतवणूक (ब्राझील) | ||
याचे नावाने नामकरण | |||
स्थान | एल साल्वादोर, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक | ||
कार्यक्षेत्र भाग | एल साल्व्हाडोर (इ.स. २०२१ – ), मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक | ||
कार्यभाषेचे नाव |
| ||
विकसक |
| ||
संस्थापक |
| ||
चालन प्रणाली (ओएस) | मायक्रोसॉफ्ट विंडोज, GNU/Linux, मॅकओएस, अँड्रॉईड | ||
संचेतन आवृत्ती |
| ||
स्थापना |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
महत्वाची घटना |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
उद्गमसंपादन करा
हे चलन सर्वप्रथम ३ जानेवारी २००९ साली अस्तित्वात आले.याचे मुल्य तेंव्हा १ सेंट इतके होते.५ डिसेंबर २०१७ला याचे मूल्य १४,००००० डॉलर इतकी झाली होती. बिटकॉइन्स कसे मिळतात ? १) वस्तु व सेवा विक्री केल्यास २) बिटकॉईन्स एक्स्चेंज मधून बिटकॉईन्स घेतल्यास ३) बिटकॉईन्सची अदलाबदल केल्यास बिटकॉईन्स पॉईंट्सचे बिटकॉइन नाण्यामध्ये रूपांतर करता येते , या नाण्यांना casascius कॉईन्स असे म्हणतात , या नाण्यांच्या आत एक पत्ता आणि एक passkey असते . नाण्यांनी व्यवहार करता येतात नाण्यांचे पुन्हा बिटकॉईन्स पॉईंट्स मध्ये रूपांतर करावयाचे असल्यास पत्ता व passkey टाकून नाणे बाद केले जाते आणि तेवढे पॉईंट्स संगणकीय खात्यात हस्तांतरीत होतात
टीकासंपादन करा
बिटकॉईन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.मर्यादित वापर असल्यामुळे सर्व व्यवहार बिटकॉइनने शक्य होत नाहीत ,तसेच व्यवहारांची संख्या मर्यादित असल्यामुळे बिटकॉइनच्या किमतीत जास्त चढउतार संभवतात या चलनास कोणताही कायदेशीर आधार नाही त्यामुळे कोणीही यात पैसे गुंतविल्यास व ते डुबल्यास याचेवर कार्यवाही करता येऊ शकत नाही.बिटकॉइन साठी वापरलेले तंत्रज्ञान अपुरे आहे , कारण बिटकॉईन्ससाठी लागणारे तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत करावे लागणार आहे त्याचे पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे , कारणं याचा सर्व डोलारा विशिष्ट सदस्यांच्या ' स्वीकृतीवर आधारलेला आहे .