मुक्त आज्ञावली

वापरकर्त्यांना वापराचे, प्रत करण्याचे, बदल करण्याचे आणि केलेल्या बदलांसह पुन्हा वितरण करण्याच

'मुक्त' आज्ञावली अर्थात 'फ्री सॉफ्टवेर' (Free Software) संपादन

'फ्री सॉफ्टवेर' मधील 'फ्री'चा अर्थ 'फुकट' असा नसून, 'मुक्त' असा आहे. एखादी आज्ञावली फ्री सॉफ्टवेर असणे हे त्या सॉफ्टवेरबाबत लोकांना देण्यात आलेल्या काही मूलभूत हक्कांवर अवलंबून आहे. फ्री सॉफ्टवेर ही संकल्पना सॉफ्टवेयर जगतात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेरची अधिकृत वेबसाईट पहा : http://www.fsf.org/

फ्री सॉफ्टवेरची व्याख्या (अधिकृत वेबसाईटनुसार) पुढीलप्रमाणे आहे :
एखादे सॉफ्टवेर फ्री सॉफ्टवेर म्हणवण्यासाठी, पुढील बाबींमध्ये सॉफ्टवेरच्या वापरकर्त्यांना मुक्तता दिली असली पाहिजे. :

  • कोणत्याही उद्दीष्टासाठी सॉफ्टवेर प्रोग्रॅम 'रन' करणे, म्हणजे वापरणे ह्यास मुक्त परवानगी (मुक्ततेची मूलभूत - शून्य - पातळी)
  • सॉफ्टवेरचा, त्याच्या अंर्तगत रचनेचा अभ्यास करणे आणि आपल्या गरजेनुसार त्यात बदल करणे ह्यास परवानगी. (मुक्तता पातळी एक) - ह्यासाठी सॉफ्टवेरचा 'सोर्स कोड' म्हणजेच मूळ प्रोग्रॅम उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
  • सॉफ्टवेरच्या कॉपी इतरांस देण्यास मुक्त परवानगी. (मुक्तता पातळी दोन )
  • सॉफ्टवेरमध्ये सुधारणा करणे व त्या लोकांच्या उपयोगासाठी प्रसिद्ध करण्यास मुक्त परवानगी - ह्यासाठी सॉफ्टवेरचा 'सोर्स कोड' म्हणजेच मूळ प्रोग्रॅम उपलब्ध असणे अनिवार्य आहे.(मुक्तता पातळी तीन)

बाह्य दुवे संपादन