बायो डीझेल
बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन. कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कलीमध्ये रूपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल. बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेलसारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.
वापर
संपादनअमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशियामध्येकरतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेलसाठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायोडिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. बायोडिझेलच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल. पडीक जमिनीमध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत. मर्सिडीजच्या बायोडिझेल कारच्या रॅलीचे आयोजन करण्यात येते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |