बरकतुल्लाह खान स्टेडियम
(बरकतुल्लाह खान मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
बरकतुल्लाह खान स्टेडियम हे भारताच्या जोधपूर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. ह्याचे नाव राजस्थानचे ६ वे मुख्यमंत्री बरकतुल्ला खान यांच्या नावावर ठेवले आहे.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | जोधपूर, राजस्थान, भारत |
स्थापना | १९८६ |
आसनक्षमता | ४०,००० |
मालक | राजस्थान क्रिकेट असोसिएशन |
यजमान | राजस्थान क्रिकेट संघ |
| |
प्रथम ए.सा. |
८ डिसेंबर २०००: भारत वि. झिम्बाब्वे |
अंतिम ए.सा. |
२१ नोव्हेंबर २००२: भारत वि. वेस्ट इंडीज |
शेवटचा बदल २३ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
८ डिसेंबर २००० रोजी भारत आणि झिम्बाब्वे संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.