फिओना शॉ
फिओना शॉ (जन्म फिओना मेरी विल्सन; १० जुलै १९५८) एक आयरिश चित्रपट आणि नाटक अभिनेत्री आहे. रॉयल शेक्सपियर कंपनी आणि नॅशनल थिएटर, तसेच चित्रपट आणि दूरचित्रवाणीमध्ये व्यापक कामासाठी ती ओळखली जाते. ती २०२० मध्ये आयर्लंडच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट कलाकारांच्या आयरिश टाईम्सच्या यादीत २९ व्या क्रमांकावर होती.[१] २००१ मध्ये राणी एलिझाबेथ दुसरी यांनी तिला ऑनररी कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) म्हणून नियुक्त केले होते.[२]
Irish actress (born 1958) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Fiona Shaw |
---|---|
जन्म तारीख | जुलै १०, इ.स. १९५८ काउंटी कॉर्क |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
पद |
|
वैवाहिक जोडीदार |
|
पुरस्कार |
|
इलेक्ट्रा , ॲज यू लाइक इट, द गुड पर्सन ऑफ झेचवान (१९९०), आणि मशिनल (१९९४) या नाटकांमधील भूमिकांसाठी तिने १९९० चा लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार जिंकला आहे. मेफिस्टो (१९८६), हेड्डा गॅबलर (१९९२), आणि हॅपी डेज (२००८) मधील भूमिकांसाठी तिला तीन ऑलिव्हिये पुरस्कार नामांकन मिळाले आहे. तिने मेडिया (२००२) मध्ये शीर्षक भूमिका साकारून ब्रॉडवे पदार्पण केले ज्यासाठी तिने नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले. द टेस्टामेंट ऑफ मेरी (२०१३) या कोल्म टोबिनच्या नाटकात ती ब्रॉडवेवर परतली.
चित्रपटात, तिने हॅरी पॉटर चित्रपट मालिकेत (२००१-२०१०) पेटुनिया डर्सलीची भूमिका केली आहे; म्हणजे हॅरी पॉटरची मावशी. माय लेफ्ट फूट (१९८९), पर्स्युएशन (१९९५), जेन आयर (१९९६), द ट्री ऑफ लाइफ (२०११), कोलेट (२०१८), अमोनाईट (२०२०), आणि एनोला होम्स (२०२०) मधील इतर उल्लेखनीय चित्रपट भूमिकांचा समावेश आहे.
तिच्या दूरचित्रवाणी भूमिकांमध्ये एचबीओ चित्रपट आरकेओ २८१ (१९९९) मधील हेड्डा हॉपर (अमेरिकन स्तंभलेखक आणि अभिनेत्री) आणि मालिका ट्रू ब्लड (२०११) मधील मार्नी स्टोनब्रूक यांचा समावेश आहे. तिने बीबीसी मालिका किलिंग इव्ह (२०१८ - २०२२) मध्ये कॅरोलिन मार्टेन्सची भूमिका केली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी बाफ्टा टीव्ही पुरस्कार, तसेच दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार नामांकन मिळाले. फ्लीबाग (२०१९) मधील समुपदेशक म्हणून तिच्या भूमिकेसाठी, तिला कॉमेडी मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्काराचे नामांकन मिळाला होते. तिने बीबीसी वन मालिका बॅप्टिस्ट (२०२१), आणि डिस्ने+ मालिका ॲन्डोर (२०२२) मध्ये काम केले आहे.
शॉचा जन्म १० जुलै १९५८ ला [३] कोभ, काउंटी कॉर्क, आयर्लंड येथे झाला.[४][५] भौतिकशास्त्रज्ञ मेरी विल्सन [६] आणि नेत्रचिकित्सक डेनिस जोसेफ विल्सन यांची ही मुलगी आहे ज्यानी १९५२ मध्ये लग्न केले होते. त्यांचे मॉन्टेनॉट येथे घर होते.[७][८] तिने कॉर्कमधील स्कोइल म्हुइरे येथे माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आणि युनिव्हर्सिटी कॉलेज कॉर्क येथे तत्त्वज्ञानाची पदवी प्राप्त केली. शॉने लंडनमधील रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट (RADA) मध्ये शिक्षण घेतले व १९८२ मध्ये अभिनयात पदवी प्राप्त केली.[९]
वैयक्तिक जीवन
संपादनशॉ एक लेस्बियन आहे, जरी तिने तिच्या लैंगिक प्रवृत्तीची जाणीव होण्यापूर्वी अनेक वर्षे पुरुषांशी संबंध ठेवले होते. ती असे सांगते की, "हा एक धक्का होता. मी स्वतः द्वेषाने भरलेली होती आणि मला वाटले की मी लवकरच परत येईन. पण तसे झाले नाही."[१०]
२००२ ते २००५ पर्यंत, शॉ इंग्रजी अभिनेत्री सॅफ्रॉन बरोजची जोडीदार होती.[११] श्रीलंकेतील अर्थतज्ज्ञ सोनाली डेरानियागाला यांचे चरित्र वाचल्यानंतर ती त्यांना भेटली[१२] आणि त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले.[१३]
संदर्भ
संपादन- ^ Clarke, Donald; Brady, Tara. "The 50 greatest Irish film actors of all time – in order". The Irish Times (इंग्रजी भाषेत). 10 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Honorary CBE notice for Shaw". BBC News. 30 December 2000. 8 December 2012 रोजी पाहिले.
- ^ UPI Staff (10 July 2018). "Famous birthdays for July 10: Sofia Vergara, Fiona Shaw". United Press International. 6 February 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Fiona Shaw". London: Film.guardian.co.uk. 8 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Fiona Shaw says she wanted to give her character in 'Killing Eve' an Irish accent". The Irish Independent. 9 May 2014. 20 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "Tim Teeman » Fiona Shaw: 'I have enormous sadness in me'". timteeman.com. 10 December 2009. 2 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Dedicated ophthalmic surgeon with a lifelong interest in all things artistic". The Irish Times.
- ^ Fiona Shaw Biography at Film Reference.com
- ^ "RADA Student & graduate profiles - Fiona Shaw". rada.ac.uk. 28 September 2022 रोजी पाहिले.
- ^ Brown, Steve (1 July 2019). "'Killing Eve' star Fiona Shaw was full of 'self-hatred' when she realised she was gay". Attitude (इंग्रजी भाषेत). 27 October 2021 रोजी पाहिले.
- ^ Neligan, Orla (2 October 2016). "Fiona Shaw: We don't know who were are and the joy is in finding out". Irish Independent (इंग्रजी भाषेत). 13 August 2018 रोजी पाहिले.
- ^ Hogan, Michael (3 March 2019). "Fiona Shaw: 'I'm delighted to be in with the young crowd!'". The Guardian. 19 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Fiona Shaw Married Status: Meet Her Wife, Dr Sonali Deraniyagala". LiveRampUp (इंग्रजी भाषेत). 16 March 2017. 10 July 2021 रोजी पाहिले.