१२१२५/१२१२६ प्रगती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते मुंबई दरम्यान रोज धावणारी एक जलद एक्सप्रेस आहे. पुणे रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकांदरम्यान धावणारी ही गाडी ह्या दोन शहरांदरम्यान नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे एक वाहतूकसाधन आहे. २७ डिसेंबर १९९१ रोजी ह्या गाडीचे उद्घाटन करण्यात आले व सध्या मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या ६ जलद गाड्यांपैकी ती एक आहे.

प्रगती एक्सप्रेसचा फलक

प्रगती एक्सप्रेस कल्याणमार्गे न धावता दिवा-पनवेल-कर्जत ह्या मार्गावरून जाते ज्यामुळे नवी मुंबईमधील रहिवाशांना ह्या गाडीचा लाभ घेता येतो.

४ नोव्हेंबर, २०१८पासून या गाडीला उत्कृष्ट प्रकारचे डबे आहेत.[] २५ जुलै २०२२ पासून LHB आणि विस्टाडोम डब्यासह धावत आहे

तपशील

संपादन
गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१२१२६ पुणे – मुंबई छशिट ०७:५० ११:१५ रोज ५४ किमी/तास १८६ किमी
१२१२५ मुंबई छशिट – पुणे १६:२५ १९:५० रोज ५४ किमी/तास
स्थानक क्रम स्थानक संकेत स्थानक/शहर अंतर
CSTM छत्रपती शिवाजी टर्मिनस 0
DR दादर
TNA ठाणे ३३.३
PNVL पनवेल ६६.२
KJT कर्जत ९४.८
LNL लोणावळा १२२.६
SVJR शिवाजीनगर १८३.८
PUNE पुणे १८६.३
  1. ^ "प्रगती एक्सप्रेसला उत्कृष्ट डबे". इकोनॉमिक टाइम्स.कॉम. २०१८-१२-३० रोजी पाहिले.