प्यादे हा बुद्धिबळातील एक सैन्य प्रकार आहे.

प्यादे
बुद्धिबळातील सोंगट्या
Chess kdt45.svg राजा Chess klt45.svg
Chess qdt45.svg राणी Chess qlt45.svg
Chess rdt45.svg हत्ती Chess rlt45.svg
Chess bdt45.svg उंट Chess blt45.svg
Chess ndt45.svg घोडा Chess nlt45.svg
Chess pdt45.svg प्यादे Chess plt45.svg


पायदळाचे प्रतिनिधीत्व करणारे प्यादे हे बुद्धिबळातील संख्येने विपूल, पण इतरांपेक्षा तुलनेने सर्वात कमी ताकदीचे सैन्य आहे.

दोन्ही खेळाडूंकडे प्रत्येकी ८ प्यादे असतात. खेळात प्याद्यांची जागा दुसऱ्या रांगेत असते. पहिल्या रांगेतल्या प्रत्येक मोहोऱ्या पुढील घरांत एक प्यादे असते.

अधिकृत नियमावलीत प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी इतरांपेक्षा वेगळे असलेल्या प्याद्यांना "मोहोरे" म्हणून संबोधले जात नाही.

चालसंपादन करा

8 
 
 
               
               
               
               
               
               
               
               
 
 
प्याद्यांची सुरुवातीची पटावरील स्थिती


8

 
 
               
               
               
               
               
               
               
               
 
 
प्याद्याला शक्य असणाऱ्या चाली. प्यादे पुढच्या घरात जाउ शकते. जर पहिलीच चाल असेल तर दोन घरे किंवा एक घर जाण्याचा पर्याय असतो..


प्याद्याच्या चालीचे नियम इतर मोहोऱ्यांपेक्षा बरेच वेगळे आहेत.

प्याद्याला कोणत्याही परिस्थितीत माघारी येता येत नाही.

प्यादे फक्त सुरुवातीची पहिली चाल दोन घरे पुढे चालू शकते (ते सुद्धा पुढची दोन्ही घरे मोकळी असली तरच).

इतर वेळी प्याद्याला फक्त एक घर पुढे चालता येते.

पुढच्या घरांत स्वपक्ष किंवा शत्रू पक्षाचे कोणतेही मोहोरे / प्यादी असल्यास प्याद्याला पुढे जाता येत नाही, कारण प्याद्याला पुढील सरळ रेषेतील घरात असलेल्या मोहोऱ्यावर वार करण्याची मुभा नसते.

वारसंपादन करा

शत्रू पक्षाचे मोहोरे जर प्याद्याच्या पुढच्या दिशेला तिरक्या रेषेतील (उजवी कडे किंवा डावी कडे) पहिल्या घरांत असेल तरच प्यादे वार करू शकते.