पेत्रोपावल (कझाक: Петропавл) हे कझाकस्तानच्या उत्तर कझाकस्तान प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. २००९च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,०१,४४६ होती.

हे शहर इशिम नदीकाठी वसलेले असून ट्रान्स सायबेरियन रेल्वेवरील एक स्थानक आहे. हे शहर ओम्स्क पासून २६१ किमी पश्चिमेस आहे. पेत्रोपावल विमानतळ शहरापासून ११ किमी दक्षिणेस आहे. १९१७च्या क्रांतीपर्यंत पेत्रोपावल रेशीम आणि जाजमांच्या व्यापाराचे मोठे केन्द्र होते.

या शहराची स्थापना १७५२मध्ये रशियाच्या लष्करी ठाण्याच्या स्वरुपात झाली होती. या शहराचे नाव सेंट पीटर आणि सेंट पॉल या ख्रिश्चन संतांच्या रशियन नावांवरुन ठेवण्यात आले आहे.