पेठ (डहाणू)
पेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
?पेठ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ०.१८७५१ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
७३४ (२०११) • ३,९१४/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली,वाडवळी. |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०७ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
भौगोलिक स्थान
संपादनडहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३४ किमी अंतरावर आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१]
लोकजीवन
संपादनहे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६० कुटुंबे राहतात. एकूण ७३४ लोकसंख्येपैकी ३७५ पुरुष तर ३५९ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.६२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७७.०४ आहे तर स्त्री साक्षरता ४९.६७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११० आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १४.९९ टक्के आहे.वाडवळ आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादनगुंगावाडा, वाडापोखरण, भारड, घोळ, तवा, धामाटणे, कोल्हाण, धाकटी डहाणू, ताडीआळे, धुमकेत, पोखरण ही जवळपासची गावे आहेत.तवा समूह ग्रामपंचायतीमध्ये धामाटणे, कोल्हाण, पेठ आणि तवा ही गावे येतात.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
७. https://palghar.gov.in/tourism/
- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, बुधवार दिनांक २२ मे २०२४.