पुष्यमित्र शुंग हा प्राचीन उत्तर भारतातील एक हिंदू राजा होता व शुंग साम्राज्याचा संस्थापक होता. मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. पुष्यमित्र शुंग हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ हा दुर्बल आणि अहिंसक असल्यामुळे त्याची हत्या केली व तो स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अशा प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले.

शुंग साम्राज्याचा विस्तार

पुष्यमित्र शुंग हा एक महान सेनानी होता. त्याने डेमेट्रियसचे या ग्रीक राजाचे आक्रमण परतवून लावले, तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले.

पुष्यमित्र शुंगावरील पुस्तकेसंपादन करा

  • भारतीय इतिहासातील पडद्याआड गेलेले वीरपुरुष : धोधा बाप्पा, पुष्यमित्र शुंग, पौरस, बख्तार खान, विक्रमादित्य, हरिहर बुक्क (जनार्दन ओक)