पुष्पक विमान
हिंदू धर्म ग्रंथामध्ये उल्लेख असलेले विमान
पुष्पक हे हिंदू पुराणांत व रामायणात उल्लेखलेले एक विमान होते. मय दैत्याने हे विमान कुबेरासाठी बनवले. परंतु कुबेराचा पराभव केल्यावर पुढे ते रावणाच्या ताब्यात आले. रामायणातील उल्लेखांनुसार युद्धात रावणास हरवल्यानंतर लक्ष्मण, मारुती या आपल्या सहकाऱ्यांसोबत राम व सीता पुष्पक विमानातून अयोध्येला परतले.