कुबेर
कुबेर (संस्कृत : कुबेर ,इंग्रजी : Kubera ) हा हिंदू पुराणांप्रमाणे देवांचा खजिनदार आणि त्याचवेळी उत्तर दिशेचा दिक्पाल देव समजला जातो. तो विश्रवस् ऋषींचा पुत्र होता तसेच लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊही होता. पित्याचे नाव 'विश्रवस्' असल्याने कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचे नाव इडविडा असल्याने कुबेर ऐडविड या मातृक नावानेदेखील तो ओळखला जातो. हिंदू पुराणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपति समजला जातो.
कुबेर ऐडविड | |
सान आंतोनियो कला संग्रहालयातील कुबेराचे शिल्प (निर्मिती: उत्तर भारत; इ.स.चे १० वे शतक ;) यक्ष, धन - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | श्री कुबेर स्वामी |
संस्कृत | कुबेर |
निवासस्थान | अलकापुरी |
लोक | धनदेवता श्री कुबेर स्वामी यांची सेवा |
वाहन | पुष्पक |
शस्त्र | गदा |
वडील | विश्रवस् |
आई | इडविडा |
पत्नी | हारिति व भद्रादेवी |
अपत्ये | मणिभद्र ,नलकुबेर |
मंत्र | “ऊॅं श्रीं, ऊॅं ह्रीं श्रीं, ऊॅं ह्रीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय: नम:” |
तीर्थक्षेत्रे | श्री कुबेर स्वामी सुवर्ण मंदिर,नाशिक, महाराष्ट्र
७०७, गोरखे वस्ती, श्री कुबेर स्वामी सुवर्ण मंदिर, सरूळ - बेळगाव ढगा रोड, बेळगाव ढगा, नाशिक, महाराष्ट्र ४२२२१३ |
बौद्ध धर्मातही वैश्रवण या नावाने ओळखला जाणारा कुबेर उत्तर दिशेचा दिक्पाल व यक्षांचा अधिपति मानला जातो.
ब्रह्मदेवाची वर्षनुवर्षे उपासना केल्याने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व, लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान बहाल केले. पुढे रावणाने त्याच्यावर स्वारी करून लंका आणि पुष्पक विमान यावर कब्जा केला. कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.
भद्रा
संपादनहिंदू धर्मात, भद्रा ही शिकारीची देवी आहे. भगवान कुबेराची पत्नी असलेली भद्रा भगवान सूर्यदेव व देवीछाया यांची कन्या आणि शनीची बहीण लागते.
भद्रा देवी ही मणिभद्र व नलकुबेराची माता आहे.[१]
कुबेराची मंदिरे
संपादन- महाराष्ट्रातल्या नाशिक शहरातले ७०७, गोरखे वस्ती येथील सरूळ - बेळगावढगा रोडवर असलेले देऊळ.
- महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहराला खेटून असलेल्या पळशी रस्त्यावर पारदेश्वर महादेव मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी कुबेराचे मंदिर आहे.
कुबेराची आणखी मंदिरे
संपादन- श्री कुबेर गणपति मंदिर, भोसरी (पुणे)
- कुबेराचे स्वतंत्र मंदिर, जागेश्वर धाम (अल्मोडा, उत्तराखंड)
- कुबेर मंदिर, मंदसौर (मध्य प्रदेश)
- कुबेर भंडारी मंदिर, करनाली (बडोदा)
- श्री लक्ष्मी कुबेरार मंदिर, रत्नमंगलम् (मद्रास)