पुएब्ला (शहर)
हा लेख मेक्सिकोतील पेब्ला नामक शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेब्ला (निःसंदिग्धीकरण).
ग्वादालाहारा (स्पॅनिश: Puebla) ही मेक्सिको देशाच्या पेब्ला ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या मध्य भागात मेक्सिको सिटीच्या पूर्वेस तर बेराक्रुथच्या पश्चिमेस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले पेब्ला मेक्सिकोमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (मेक्सिको सिटी व ग्वादालाहारा खालोखाल) आहे.
पेब्ला Heroica Puebla de Zaragoza |
||
मेक्सिकोमधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | पेब्ला | |
स्थापना वर्ष | इ.स. १५३१ | |
क्षेत्रफळ | ५३४.३ चौ. किमी (२०६.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७,००५ फूट (२,१३५ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | १५,३९,८१९ | |
- महानगर | २६,६८,३४७ | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ६:०० | |
pueblacapital.gob.mx |
येथील बरोक व रानिसां स्थापत्यशास्त्राच्या इमारती व वास्तूंसाठी पेब्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
खेळसंपादन करा
फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून पेब्ला एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९७० व १९८६ फिफा विश्वचषकांधील यजमान शहरांपैकी पेब्ला हे एक होते.
संदर्भसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |