पासीघाट हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पूर्व सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,६५६ आहे. पासीघाट हे पूर्व अरुणाचल प्रदेशातील सर्वात जुने शहर आहे. पासीघाट हा मैदानी प्रदेश असून सियांग ही नदी येथे ब्रम्हपुत्रेत विलीन होते. रिव्हर राफ्टिंग, बोटिंग, मासेमारी इत्यादींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या शहराला मोठ्या संख्येने भेट देतात.

जवळची पर्यटन स्थळेसंपादन करा

पासीघाटपासून १६ किलोमीटरवर डेईंग इरिंग वन्यजीव अभयारण्य व लाली अभयारण्य आहे. लाली अभयारण्य हे भेकर व रानम्हशी यांसाठी प्रसिद्ध आहे. पासीघाटपासून १०० किलोमीटरवर सिआमॅंग पूल आहे. या पुलाच्या आसपासचा आणि पुलाच्या आधीचा आणि नंतरचा प्रदेश हा अतिशय निसर्गरम्य असा आहे. हा पूल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.[१]

 
पासीघाट येथील सियांग नदीकाठ

दळणवळणसंपादन करा

गुवाहाटीहून दिब्रुगडला येऊन बोटीने पासीघाट येथे पोहोचता येते. इटानगर हा पासीघाटजवळचा विमानतळ असून, मार्कोक्सेलेंग हे जवळचे रेल्वे स्थानकआहे. इटानगर, लखीमपूर, सिलापठार येथून पासीघाट येथे येण्यासाठी बसेस, वाहने मिळतात. येथे येण्यासाठी अनेक हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहेत.[१]

संदर्भसंपादन करा

  1. ^ a b भावे, शशिधर (तिसरी आवृत्ती -२०१३). मनोभावे देशदर्शन अरुणाचल प्रदेश. पुणे: राजहंस प्रकाशन पुणे. pp. ४८. ISBN 978-81-7434-411-3. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)