वेस्टर्न ऑस्ट्रेलिया

(पश्चिम ऑस्ट्रेलिया या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलिया देशामधील आकाराने सर्वात मोठे राज्य आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या उत्तर व पश्चिमेस हिंदी महासागर, दक्षिणेस दक्षिणी महासागर तर पूर्वेस नॉर्दर्न टेरिटोरीसाउथ ऑस्ट्रेलिया ही राज्ये आहेत. २५,२९,८७५ चौरस किमी इतक्या क्षेत्रफळाच्या भूभागावर वसलेले वेस्टर्न ऑस्ट्रेलिया रशियाच्या साखा प्रजासत्ताक खालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. येथील बव्ह्ंशी भूभाग वाळवंटी व निर्मनुष्य असून २४ लाख लोकसंख्येचा मोठा हिस्सा राज्याच्या नैऋत्य कोपऱ्यात एकवटला आहे. पर्थ ही वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रूम हे उत्तरेकडील पर्यटनासाठी एक लोकप्रिय गाव आहे.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
Western Australia
ऑस्ट्रेलियाचे राज्य
Flag of Western Australia.svg
ध्वज
Coat of arms of Western Australia.svg
चिन्ह

ऑस्ट्रेलियाच्या नकाशात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे स्थानऑस्ट्रेलियाच्या नकाशावर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे स्थान
देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राजधानी पर्थ
क्षेत्रफळ २६,४५,६१५ वर्ग किमी
लोकसंख्या २४,५१,०००
घनता ०.९४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.wa.gov.au
वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील प्रमुख शहरे, महामार्ग व रस्ते

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अर्थव्यवस्था खाणकाम, शेतीपर्यटनावर अवलंबून असून ऑस्ट्रेलियाच्या एकूण धातू निर्यातीमधील ५७ टक्के वाटा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ऑस्ट्रेलियामध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

खेळसंपादन करा

क्रिकेट हा येथील एक लोकप्रिय खेळ असून पर्थमधील वाका क्रिकेट मैदान क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: