पट्टदकल
पट्टदकल (कानडी - ಪಟ್ಟದಕಲ್ಲು - पट्टदकल्लु - (स्वैरपणे) राजबैठकीचा दगड). हे भारतातील कर्नाटक राज्याच्या बागलकोट जिल्ह्यात असलेले एक खेडे आहे. या ठिकाणास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. हे खेडे बदामीपासून २२ किलोमीटर व ऐहोळेपासून १० किलोमीटर अंतरावर आहे. येथील ऐतिहासिक मंदिरांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत चालुक्य महोत्सव नावाचा वार्षिक नृत्य महोत्सव होतो. या महोत्सवाला खूप पर्यटक येतात.
ऐतिहासिक महत्त्व
संपादनपट्टदकल ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती.
कन्नड साहित्यातील सिंगिराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती. मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ येथे खूप पूर्वी झाला असावा असे मानले जाते. येथील पापनाथ मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावरील मलप्रभा नदीच्या पात्राजवळ शेकडो दगडी हत्यारे सापडली आहेत; त्यांचा वापर येथील मंदिराच्या शिल्पकलेसाठी झाला असावा असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे. ‘ए गाइड टू जॉग्रफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील काळाच्या संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार होता असा उल्लेख आहे.
म्हणजे त्या काळात हे व्यापारीदृष्टय़ा प्रगत शहर असावे.
जागतिक वारसा स्थळ
संपादनयुनेस्कोने इ.स. १९८७ साली या ठिकाणी असलेल्या मंदिरांचा आपल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला. इ.स.च्या ८ आठव्या शतकात बांधली गेलेली ही मंदिरे भारतीय द्राविड आणि नागर या दोन्हीही स्थापत्यशैलीत आहेत.
शिल्पकला व मंदिरे
संपादनराजाश्रय
संपादनबाह्य दुवे
संपादन- युनेस्कोच्या यादीवर पट्टदकल (इंग्रजी मजकूर)