पंचमढी
पंचमढी (हिंदीत पचमढी) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील हुशंगाबाद जिल्ह्यातील एक पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणाहूनच गुप्त महादेव, छोटा महादेव, नागद्वार या स्थळांस जाता येते. हे ठिकाण सातपुडा पर्वतश्रेणीतील असून पूर्वी इंग्रजांची येथे छावणी होती.
पंचमढी हे समुद्रसपाटीपासून १,०६७ मीटर उंचीवर आहे. येथे घनदाट जंगल, खळखळाट करणारे जलप्रपात आणि तलाव आहेत. येथील जंगलात सिंह, बिबट्या, चितळ, सांबर, गवा, चिंकारा, अस्वल, रानरेडा असे अनेक जंगली प्राणी आहेत. येथील एक गुंफा ही पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाची आहे, तिच्यात शैलचित्र मिळाले आहे.
नागद्वार यात्रा, पंचमढ़ी
संपादनमध्यप्रदेशात दरवर्षी केदारनाथ यात्रेसारखीच नागद्वार यात्रा असते.
पंचमढी येथील काही प्रेक्षणीय स्थळे :
- रजत धबधबा
- बी धबधबा
- पांडव गुहा
- मोठा महादेव
- गुप्त महादेव
- चौरागड (शिवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते)
- धुपगड (मध्य प्रदेशातील व सातपुड्याचे सर्वात उंच शिखर)
- हांडी खोह (खोल खाई)
- अप्सरा धबधबा
- जटाशंकर
- डचेस झरा
- माऊंट रोजा
पंचमढीच्या आसपास या ठिकाणांखेरीज अन्य प्रेक्षणीय स्थाने आहेत.
कसे जावे
संपादन'रेल्वेने ': मुंबई-इटारसी-हावरा या रेल्वेमार्गावर पिपरिया हे पंचमढीला सर्वांत जवळचे रेल्वे स्थानक आहे.
'रस्ता : पंचमढी हे भोपाळ, इंदूर, नागपूर, हुशंगाबाद, छिंदवाडा व पिपरिया या शहरांना सरळ जोडले गेले आहे. पिपरियाहून टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.
'हवाई मार्ग ' : भोपाळ हा जवळचा विमानतळ आहे. भोपाळ विमानतळावरून दिल्ली, ग्वाल्हेर, इंदूर, मुंबई, रायपूर आणि जबलपूर या भारतातील प्रमुख शहरांत जाण्यासाठी विमानसेवा आहे.