नोवाया झेम्ल्या (रशियन: Но́вая Земля́) हे आर्क्टिक महासागरामधील एक बेट आहे. हे बेट अतिईशान्य युरोपात रशियाच्या उत्तरेस स्थित असून ते रशियाच्या अर्खांगेल्स्क ओब्लास्त ह्या प्रशासकीय विभागाचा एक भाग आहे. ह्या द्वीपसमूहाचे एकूण क्षेत्रफळ ९०,६५० चौरस किमी असून येथील लोकसंख्या केवळ २,४२९ इतकी आहे. नोवाया झेम्ल्याला युरोपामधील सर्वात पूर्वेकडील स्थान मानले जाते.

नोवाया झेम्ल्याचे रशियाच्या उत्तरेकडील स्थान

नोवाया झेम्ल्याच्या पूर्वेस कारा समुद्र तर पश्चिमेस बारेंट्स समुद्र आहेत. कारा सामुद्रधुनी नोवाया झेम्ल्याला रशियापासून अलग करते. भौगोलिक दृष्ट्या हे बेट उरल पर्वतरांगेचा एक भाग मानले जाते.

शीतयुद्धाच्या काळापासून नोवाया झेम्ल्या एक महत्त्वाचे व गुप्त लष्करी केंद्र राहिले आहे. निकिता ख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने येथे इ.स. १९६५ साली अनेक अण्वस्त्र चाचण्या केल्या होत्या.


बाह्य दुवे

संपादन