नेत्रा कुमानन (३१ ऑगस्ट १९९७)[१] ही एक भारतीय नौकानयनपटू आहे. ती भारतातील चेन्नई येथे राहते.[१] एप्रिल २०२१ मध्ये ओमान येथे झालेल्या स्पर्धेत नौकानयनातील लेसर रॅडीयल प्रकारात तिने विश्वचषक पदक जिंकले. त्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली.[२]

नेत्रा कुमानन
नेत्रा कुमानन
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान चेन्नई
जन्मदिनांक ३१ ऑगस्ट, १९९७ (1997-08-31) (वय: २६)
उंची ५ फूट ३ इंच
खेळ
देश भारत
खेळ नौकानयन
खेळांतर्गत प्रकार लेसर रेडीयल
प्रशिक्षक टामस इस्झेस, हंगेरी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०२० उन्हाळी टोकियो, जपान

कारकीर्द संपादन

नेत्राने २०१४ आणि २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. २०१८ मध्ये इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ती चौथी आली होती.[३]

२०२० साली मायामी, अमेरिका येथे झालेल्या नौकानयन विश्वचषक स्पर्धेत नेत्राने कांस्यपदक मिळवले.[४] नौकानयनात विश्वचषक पदक जिंकणारी ती पहिला भारतीय महिला आहे. तसेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारीही ती पहिली भारतीय महिला नौकानयनपटू आहे.[४]

हंगेरीचे टामस इस्झेस हे तिचे प्रशिक्षक आहेत.[५] २०१९ मध्ये तिने स्पेनमधील ग्रॅन कॅनेरीया येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.[१]

शिक्षण संपादन

ती एसआरएम युनिव्हर्सिटी, वडापलानी कॅम्पसमध्ये बीटेक-मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी संपादन

नेत्राच्या वडलांची सॉफ्टवेर कंपनी आहे. नेत्राच्या नौकानयनातील कारकिर्दीला तिच्या आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले आहे.[५] नेत्राचा भाऊ, नवीन राष्ट्रीय पातळीवरील नौकानयन स्पर्धांमध्ये सहभागी होता.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ a b c d "Sailing KUMANAN Nethra - Tokyo 2020 Olympics" Check |url= value (सहाय्य). .. (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ Apr 7, PTI /; 2021; Ist, 21:20. "Nethra Kumanan becomes first Indian woman sailor to qualify for Olympics | Tokyo Olympics News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ "Who is Nethra Kumanan". Olympics.com. 2021-07-15 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Who Is Nethra Kumanan". https://www.outlookindia.com/. 2021-07-15 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  5. ^ a b Apr 9, PTI / Updated:; 2021; Ist, 13:26. "From tennis and dancing to sailing, Nethra Kumanan's journey to Olympics | More sports News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-07-15 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)