ऑगस्ट ३१
दिनांक
(३१ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४३ वा किंवा लीप वर्षात २४४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८०३ - लुईस आणि क्लार्क पिट्सबर्गहून आपल्या मोहिमेवर निघाले.
- १८६४ - अमेरिकन यादवी युद्ध-जनरल विल्यम टी. शेरमानने अटलांटावर हल्ला केला.
- १८७६ - ऑट्टोमन सुलतान मुराद पाचव्याला पदच्युत करून त्याचा भाऊ अब्दुल हमीद दुसरा सम्राटपदी.
- १८८६ - चार्ल्स्टन, दक्षिण कॅरोलिनामध्ये भूकंप. १०० ठार.
- १८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.
विसावे शतक
संपादन- १९२० - डेट्रॉइटमध्ये पहिल्यांदा रेडियोवरून बातम्या प्रसारित झाल्या.
- १९३९ - जर्मनीच्या हस्तकांनी जर्मनीतील ग्लाईवित्झ रेडियो स्थानकावर हल्ला केला. हा हल्ला पोलंडने केल्याची सबब सांगून दुसऱ्या दिवशी जर्मनीने पोलंडवर चाल केली व दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली.
- १९५७ - मलायाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले.
- १९८६ - सेरिटोस, कॅलिफोर्नियाजवळ एरोमेक्सिको फ्लाइट ४९८ हे विमान पायपर पी.ए.-२८ प्रकारच्या विमानाव आदळले. जमीनीवरील १५सह ७९ ठार.
- १९८६ - सोवियेत संघाचे प्रवासी जहाज ॲडमिरल नाखिमोव मालवाहू जहाज प्यॉत्र व्हासेवशी आदळून बुडले. ४२३ ठार.
- १९९१ - किर्गिझस्तानला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
- १९९७ - पॅरिसमध्ये अपघातात राजकुमारी डायना व तिचा मित्र डोडी फयेद ठार.
- १९९९ - बॉयनोस एर्सच्या होर्हे न्यूबरी विमानतळावरून उड्डाण केल्यावर लगेच बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान कोसळले. जमीनीवरील दोघांसह ६५ ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००५ - बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.
- २०२३ - जोहान्सबर्गमधील इमारतीतल लागलेल्या आगीत ७४ ठार.
जन्म
संपादन- १२ - कालिगुला, रोमन सम्राट.
- १६१ - कोमॉडस, रोमन सम्राट.
- १५६९ - जहांगीर, मुघल सम्राट.
- १८४३ - जॉर्ज फोन हर्टलिंग,जर्मनीचा चान्सेलर.
- १८७० - मारिया मॉॅंटेसोरी, इटालियन शिक्षणतज्ञ.
- १८८० - विल्हेमिना पहिली, नेदरलॅंड्सची राणी.
- १९०७ - रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ - क्लाइव्ह लॉईड,वेस्ट इंडीजचे क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - जवागल श्रीनाथ,भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - क्रिस टकर, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू
संपादन- १०५६ - थियोडोरा, बायझेन्टाईन सम्राज्ञी.
- १२३४ - गो-होरिकावा जपानी सम्राट.
- १४२२ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.
- १८१४ - आर्थर फिलिप, ब्रिटिश आरमारी अधिकारी.
- १९७९ - ई.जे. स्मिथ इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - उर्हो केक्कोनेन फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९५ -बियंत सिंग, पंजाबचा मुख्यमंत्री
- १९९७ - प्रिन्सेस डायना, ब्रिटिश राजकुमारी.
- १९९७ - डोडी फयेद, ब्रिटिश उद्योगपती.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वभाषा दिन - मोल्दोव्हा.
- स्वातंत्र्य दिन - त्रिनिदाद व टोबेगो, किर्गिझीस्तान.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ३१ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - ऑगस्ट महिना