निमाडी ही एक पश्चिम हिंद-आर्यन भाषा आहे जी मध्य प्रदेश राज्यातील पश्चिम-मध्य भारताच्या निमाड प्रदेशात बोलली जाते. हा प्रदेश माळव्याच्या दक्षिणेला महाराष्ट्राच्या सिमेला लागून आहे. निमाडी ही भाषा बडवानी, खरगोन, खंडवा जिल्ह्यांत तसेच बुरहानपूर, धार, हरदा आणि देवास जिल्ह्यांच्या काही भागात बोलली जाते. निमाडी भाषेचे माळवी, गुजराती, अहिराणीमराठी इत्यादी भाषांसोबत जवळचे भाषिक संबंध आहेत. या चारही भाषांमधील गुणधर्म व शब्द निमाडी भाषेत आढळतात. निमाडीचे प्रसिद्ध लेखक गौरीशंकर शर्मा, रामनारायण उपाध्याय इत्यादी होते.

निमाडी
"निमाडी" शब्द देवनागरी लिपीमध्ये.
प्रदेश मध्य प्रदेश
लोकसंख्या २३ लक्ष (२०११)
भाषाकुळ
हिंद-युरोपीय
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-३ noe