निकाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.

  ?निकाणे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ .८७६१९ चौ. किमी
जवळचे शहर डहाणू
जिल्हा पालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,९७५ (२०११)
• २,२५४/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा वारली
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४०१६०२
• +०२५२८
• एमएच/४८ /०४

भौगोलिक स्थान

संपादन

डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २३ किमी अंतरावर आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७० कुटुंबे राहतात. एकूण १९७५ लोकसंख्येपैकी ९६५ पुरुष तर १०१० महिला आहेत. गावाची साक्षरता ४५.६० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५६.६७ आहे तर स्त्री साक्षरता ३५.०७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३६१ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १८.२८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

संपादन

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

संपादन

सूर्यानगर, वारोटी, कासा खुर्द,भिसेनगर, सारणी, रानकोळ, दाभोण, आंबिस्ते, साये, उरसे, म्हासड ही जवळपासची गावे आहेत.निकाणे समूह ग्रामपंचायतीमध्ये निकाणे, पिंपळशेत खुर्द,आणि शेलटी ही गावे येतात.

संदर्भ

संपादन

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/