नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२

नामिबिया क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. हा नामिबियाचा पहिला झिम्बाब्वे दौरा होता. तसेच दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. सर्व सामने बुलावायो मधील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब या मैदानावर झाले.

नामिबिया क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२२
झिम्बाब्वे
नामिबिया
तारीख १७ – २४ मे २०२२
संघनायक क्रेग अर्व्हाइन (१ली-४थी ट्वेंटी२०)
रेगिस चकाब्वा (५वी ट्वेंटी२०)
गेरहार्ड इरास्मुस
२०-२० मालिका
निकाल नामिबिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावा वेस्ली मढीवेरे (१६३) क्रेग विल्यम्स (१३९)
सर्वाधिक बळी सिकंदर रझा (६)
टेंडाई चटारा (६)
बर्नार्ड स्कोल्टझ (७)

झिम्बाब्वेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. नामिबियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन केले. पुन्हा झिम्बाब्वेने तिसरा सामना जिंकून आघाडी घेतली. ४थ्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकार खेचत नामिबियाने विजय मिळवून मालिका २-२ अश्या स्थितीत आणून ठेवली. मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक लढतीत नामिबियाने झिम्बाब्वेला ३२ धावांनी पराभूत करत ऐतिहासिक मालिकाविजय मिळवला. नामिबियाने पहिल्यांदाच कसोटी देशाला द्विपक्षीय मालिकेत पराभूत केले.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१७ मे २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१५३/४ (२० षटके)
वि
  नामिबिया
१४६/५ (२० षटके)
डिव्हान ला कॉक ६६ (४३)
मिल्टन शुंबा ३/१६ (३ षटके)
झिम्बाब्वे ७ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: क्रेग अर्व्हाइन (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • झिम्बाब्वे आणि नामिबिया या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नामिबियाने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • तनाका चिवंगा (झि) आणि डिव्हान ला कॉक (ना) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
१९ मे २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१२२/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
१२४/२ (१८ षटके)
मिल्टन शुंबा २९ (२६)
डेव्हिड विसी ३/२७ (४ षटके‌)
नामिबिया ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: क्रिस्टोफर फिरी (झि‌) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: क्रेग विल्यम्स (नामिबिया)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • नामिबियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


३रा सामना

संपादन
२१ मे २०२२
१३:००
धावफलक
नामिबिया  
१२८/८ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१२९/२ (१७.१ षटके)
झिम्बाब्वे ८ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
सामनावीर: वेस्ली मढीवेरे (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • ब्रॅड एव्हान्स (झि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था सामना

संपादन
२२ मे २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१५७/८ (२० षटके)
वि
  नामिबिया
१६१/४ (२० षटके)
नामिबिया ६ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: गेरहार्ड इरास्मुस (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
  • व्हिक्टर न्यौची (झि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५वा सामना

संपादन
२४ मे २०२२
१३:००
धावफलक
नामिबिया  
१२७/८ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
९५ (१९.१ षटके)
नामिबिया ३२ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)‌
सामनावीर: क्रेग विल्यम्स (नामिबिया)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.