नाताल (ब्राझिल)
नाताल (पोर्तुगीज: Natal) ही ब्राझील देशाच्या रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी व सर्वात मोठे आहे. हे शहर ब्राझीलच्या ईशान्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते एक महत्त्वाचे बंदर आहे. ८.१० लाख शहरी तर १२.४३ लाख महानगरी लोकसंख्या असलेले नाताल ब्राझीलमधील २१वे मोठे शहर आहे.
नाताल Natal |
|||
ब्राझीलमधील शहर | |||
| |||
नातालचे रियो ग्रांदे दो नॉर्तेमधील स्थान | |||
देश | ब्राझील | ||
राज्य | रियो ग्रांदे दो नॉर्ते | ||
स्थापना वर्ष | २५ डिसेंबर, इ.स. १५९९ | ||
क्षेत्रफळ | १७०.३ चौ. किमी (६५.८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ३३ फूट (१० मी) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | ८,१०,७८० | ||
- घनता | ४,७६०.९५ /चौ. किमी (१२,३३०.८ /चौ. मैल) | ||
- महानगर | १२,४३,५४७ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी - ३:०० | ||
natal.rn.gov.br |
नाताल याच्याशी गल्लत करू नका.
२०१४ फिफा विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ब्राझीलमधील १२ यजमान शहरांपैकी नाताल एक आहे. ह्यासाठी ४५,००० आसन क्षमता असणारे दुनास अरेना हे एक नवे स्टेडियम येथे बांधण्यात येत आहे.
जुळी शहरे
संपादन
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |