नाईचाकूर
नाईचाकूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यात उमरगा तालुक्यातील एक ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत गाव म्हणून नावलौकिक आहे.
?नाईचाकूर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उमरगा |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | चंद्रकांत स्वामी |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनऐतिहासिक स्थान
संपादनमराठवाडा मुक्तीसंग्रामात नाईचाकूरचे योगदान
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
15 आॅगस्ट 1947! भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण हैदराबाद संस्थान मात्र अजूनही पारतंत्र्यात होते. मराठवाड्यातील जनतेने निजामाची जुलमी राजवट उखडून टाकली, त्यासाठी मोठा संघर्ष केला. यात स्वातंत्र्यलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नाईचाकुर गावाचा सहभागही मोलाचा होता.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैद्राबाद संस्थानात निजामी जुलमी राजवट होती. त्यांनी हिंदूवर अनंत अत्याचार केले जात होते. निजामाने आपल्या अत्याचारांसाठी वापर केला. 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन' संघटनेचा कासिम रझवी हा प्रमुख होता. याने या अंतर्गत 'रझाकार' नावाची संघटना काढली. ही निमलष्करी संघटना होती. सैनिकी वेश परिधान करून धारदार फावडे हातात घेऊन रझाकार फिरायचे. मुलींची अब्रु असुरक्षित झाली होती. बलात्कार करणे,एकटयास गाठून हत्या इत्यादी कृत्य रझाकार करत होते. धर्माच्या नावाखाली चालणारी संघटना असलेल्या मुळे अजाणतेपणी बहूसंख्य मुस्लिम समाज रझाकारांना पाठिंबा देत होता.
या आंदोलनाची सुरुवात १९२५ साली निजामानी गावातील हेमाडपंती मंदिर पाडले. या मंदिर परिसरात अनेक देव - देवतांच्या अनेक मुर्त्या होत्या. त्यापैकी एक देवीची मूर्ती गावातील काही मंडळीने मुर्तीची विटंबना होऊ नये म्हणून एका शेतकऱ्यांच्या शेतात खोकला माॅ म्हणून प्रस्थापित केले. तसेच या मंदिराचे कोरीव -रेखीव दगड आजही विविध ठिकाणी उत्खननात मिळतात. या ठिकाणी 'निजाम पोलीस ठाणे' तयार करून अत्याचारास अधिक तिव्रतेने सुरुवात केली. या प्रतिकाराची गावातील दोन पिढ्याचे योगदान राहिले.
प.पू. शंभोगिरी जी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उमरगा येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात ५०० ते ६०० क्रांतिकारक सहभागी झाले होते. यामध्ये उमरगा परिसरातील तसेच नाईचाकूर पंचक्रोशीतील क्रांतीकारक सहभागी झाले होते. यामध्ये नाईचाकूरच्या क्रांतीकारकांना पकडण्यासाठी आलेल्या ५ रझाकार पठाणास ठार मारून भूमिगत झाले. राष्ट्रीय विचारांच्या अनेक ठिकाणी शाळांची सुरुवात करण्यात आली. यांचे अनुकरण करून गोविंद पवार व अन्य गावातील क्रांतीकारकांनी गावात शाळा सुरू केले होते. हे निजाम ठाणेदार अमीन साहेबाला समजले. त्यांनी 'सरकार द्रोहाचा' आरोप ठेवून शाळेतील विद्यार्थी, पालक यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शाळा बंद करावी लागली.
याच कालावधी साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांची नाईचाकूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा नाईचाकूर- सरवडीच्या मध्यभागी काही एकर शिंदीचे बन होते. याच बनात सभा झाली. पुढिल आंदोलनाची दिशा निश्चित ठरवण्यात आली. काही दिवसात गावातील युवकांनी हे शिंदीचे बन तोडून फेकून दिले. हजारो रूपयाचे उत्पन्न रातोरात नष्ट केले. या सोबत शिंदी जमा करणारी केंद्रे नष्ट केले, दारूच्या भटट्या पाडून टाकण्यात आल्या.पैसा लुटून स्वातंत्र्याच्या कामासाठी वापर केला. - महिलांचे योगदान:- भूमिगत असणाऱ्या क्रांतीकारकास भोजन पुरवणे, निरोप, विविध पत्रके पोहचवणे, आंदोलकांना आश्रय देऊन सांभाळ करणे, या बरोबर भूमिगत क्रांतीकारकांच्या परिवाराची काळजी घेणे. निजाम साहेबाच्या बायकांसोबत चर्चेतून महत्त्वाची माहिती क्रांतीकारकास पुरवणे असे अनेक महत्त्वाची कामे महिलांनी केले. - इस्माईल मेहबूब मुल्ला हा रझाकाराचा विश्वासू व्यक्ति होता. गावातील महिला, क्रांतीकारकांच्या घरातील लोकांना त्रास देवू लागला. महिलांची अब्रु लुटू लागला. यामुळे क्रांतीकारक प्रचंड चिडले १० जून १९४८ रोजी मध्य रात्री त्याला ठार करण्यात आले. या मध्ये रामचंद्र जहागिरदार, तुळशीराम सांळुके, तुळशीराम धनगर सहभागी होते.
पोलिस ठाण्यावर हल्ला :- नाईचाकूर गावात मोठे पुलिस ठाणे होते. निजाम सरकारने आपल्या संस्थानातील नागरिकांना हत्यार वापरण्यास बंदी घालण्यात आली. यावेळी नाईचाकूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घरातील झडती घेऊन हत्यारे जप्त करण्यात येवू लागले. तीच हत्यारे रझाकार संघटनेला पुरविली जाणार होती. नाईचाकूर ठाण्यात गोळा केलेल्या हत्यारात ३०० बंदुका. एक गाडी तलवारी होत्या. हे सर्व साहित्य रझाकारांना दिले जाणार होती. म्हणून १५ जानेवारी १९४८ रोजी रात्री १२ च्या सुमारास पंचक्रोशीतील क्रांतीकारकांनी हल्ला करून पोलीस ठाणे लुटले. यांचे नेतृत्व हाडोळीचे मोहन पाटिल, नाईचाकूर येथील गोविंद पवार, शाहूराज जाधव, राम पवार, व्यंकट माने यांनी केले.
या सोबतच झेंडा सत्याग्रह, हात बॉब तयार करणे, आलुरच्या निजामी मिलिटरी ठाण्यावर हल्ला, घोळसगाव जेल मधील पोलिसांवर हल्ला, व्यापारी लुट, घोरवडी रझाकार केंद्रावर हल्ला, अशा अनेक आंदोलनात नाईचाकूर गावातील शेकडो क्रांतीकारकांनी या लढ्यात नेतृत्व करून मोलाचे योगदान दिले. अशा गावोगावी चाललेल्या आंदोलनाचा लढ्याचा परिणाम म्हणजे १३ ते १७ सप्टेंबर १९४८ या कालावधीत १०९ तासाचे ऑपरेशन कबड्डी, पोलो, टक्कर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर हैद्राबाद संस्थानच्या निजामाने शरणागती पत्करली आणि भारतात विलिन करून घेतले. मराठवाडा स्वंतत्र झाला.
हवामान
संपादनयेथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनग्रामदैवत कुत्रोबा
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
'नाई' या मुळच्या कन्नड शब्दाचा अर्थ कुत्रा असा होतो. म्हणजे कुत्राच्या नावाची ओळख जोपासणारे गाव म्हणजे नाईचाकूर. चाकूर या नावाची इतरही गावे आहेत. पण या ठिकाणच्या आख्याइकेनुसार महाभारत काळात चक्रपूर नावाची नगरी ही होती. त्या नगरीतच भीमाने बकासूर राक्षसाला ठार मारले असे येथील लोकांचे म्हणणे आहे. या चक्रपूर अथवा चक्रवर्ती नगरीत एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला तीर्थ यात्रेला जायचे होते. त्याने जवळच असलेल्या हाडोळी गावातील सावकाराकडून कर्ज घेतले. तारण म्हणून त्या शेतकऱ्यांने सावकाराकडे कुत्र्याला गहाण ठेवले व कर्ज घेऊन तो तीर्थयात्रेला गेला. दरम्यान सावकाराच्या घरी मोठी चोरी झाली. चोरांनी भरपूर धन साठविलेल्या मोठ-मोठ्याल्या पेट्या पळविल्या आणि जवळच असलेल्या ओढ्याच्या डोहात टाकल्या. सुर्योदय होतातच सावकाराच्या लक्षात आले की आपल्या घरी वाड्यात मोठी चोरी झालेली आहे. गाव सारे सावकाराच्या वाड्यात आले. शेतकऱ्यांचा कुत्रा विशिष्ट दिशेकडे तोंड करून भूंकू लागला. त्याच्या भुंकण्याकडे काही जानकारी लोकांनी लक्ष दिले. कुत्रा ओढ्याच्या बाजूला जावू लागला. या कुतुहलापोटी काहीजण कुत्र्याच्या मागे मागे गेले. त्या डोहात लोकांनी उड्या मारून पाहिले. तर आत सावकाराच्या धनाच्या पेट्या सापडल्या. सावकाराला फार आनंदित झाले. त्याने कुत्र्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधून मला माझी रक्कम मिळाली तू कर्ज देण्यासाठी येवू नको म्हणून कुत्र्याला कृतज्ञतेपोटी पाठवून दिले. कुत्रा चक्रपूराकडे निघाला गावशिवारातील ओढ्याजवळ आला. तेवढ्यात कर्जफेड करण्यासाठी रक्कम घेऊन निघालेला शेतकरी व कुत्रा यांची ओढ्याजवळच भेट झाली. हा "कुत्रा पळून आला - मी खोटा ठरलो " असे समजून शेतकऱ्याने प्रामाणिक कुत्रा जवळ येताच भला मोठा दगड उचलून कुत्र्याच्या डोक्यात घातला. कुत्रा जागेवरच गतप्राण झाला. आडवा पडलेल्या कुत्राच्या गळ्यातील चिठ्ठी पाहिले. ही चिठ्ठी घेऊन शेतकरी सावकाराच्या घरी गेला. सावकाराने सर्व हक्कीखत सांगितले. शेतकऱ्याला वाईट वाटले. ज्या ठिकाणी कुत्रा गतप्राण झाला तेथील दगडाची अाजही पुजा केली जाते. आणि त्याचीच आठवण म्हणून शेतकऱ्याच्या गावात गावकऱ्यांनी कुत्र्याचे मंदिर उभारणी केली. दगडाची कोरीव मूर्ती त्यावर तांबे धातूची पत्राची प्रतिकृती रेखून (मढवून) नित्यनेमाने पूजाअर्चा केली जाते. इतकेच नव्हे तर या गावचे "ग्राम दैवत "च कुत्रा आहे. अशा कुत्र्याच्या (नाई) नावावरून आणि चक्रपूरचा कालौघात झालेले चाकूर होय. नाईचाकूर बनलेले गाव ३० सप्टेंबर १९९३ च्या भूकंपात उध्वस्त झाले. मुळ गावाचे नवीन ठिकाणी पुनर्वसन झाले. पुनर्वसित गावातही "कुत्रोबा मंदिर" गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने उभारलेले आहे. एकेकाळी पांढऱ्या मातीच्या मोठ्या ढिगार्यावर असणाऱ्या गावात अजून ही मोठ्या प्रमाणात लाल रंगाची मडकी(सगळीपालथी) सापडतात. सातवाहन काळातील विटा सापडतात. (लाल मोठ्या चौरसाकृती) काही संशोधन, उत्खनन करण्याची यातून निश्चितच इतिहासाला धागेदोरे मिळतील.
नागरी सुविधा
संपादनमहाराष्ट्र ग्रामीण बॅक
संपादनतलाठी कार्यालय
संपादनग्रामपंचायत
संपादनप्राथमिक आरोग्य केंद्र
संपादनजिल्हा परिषद अंतर्गत १ ली ते १० वी शाळा
संपादनसमाजसेवा शिक्षण संस्था संचलित १ली ते १२ वी
संपादनकृषी विद्यालय
संपादनजवळपासची गावे
संपादननारंगवाडी, कासार-शिरशी, उमरगा, किल्लारी