द्रवीकृत नैसर्गिक वायू
द्रवीकृत नैसर्गिक वायू ("द्रनैवा") (CNG-compressed natural gas) हा मिथेन (CH4) या नैसर्गिक वायूपासून बनवतात. हा वायू समुद्रतळातून नळाने द्रवीकरण प्रकल्पापर्यंत आणला जातो. तेथे हा वायू द्रवरूपात बदलला जातो. द्रवरूपात आल्यामुळे वायूचे आकारमान एकाच्या सहाशेव्या भागाएवढे कमी होते. आकारमान कमी झाल्याने वायूचा साठवणूक व वाहतूक खर्च कमी होतो. हा वायू गंधहीन तसेच रंगहीन असतो.
उत्पादन
संपादननैसर्गिक वायू मध्ये ९० टक्के मिथेन वायू असतो. तसेच अतिशय लहान प्रमाणात इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि नायट्रजन वायू असतात. द्रवीकरण प्रकल्पात यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून १०० टक्के मिथेन वायू तयार केला जातो व द्रवरूपात बदलला जातो. जगभरात या वायूची निर्यात करण्यासाठी खास करून बनवलेल्या समुद्री जहाजांचा वापर करण्यात येतो.
एकूण जागतिक उत्पादन
संपादनवर्ष | उत्पादन (कोटी टन प्रती वर्ष) |
---|---|
१९९० | ५ |
२००२ | १३ |
२००७ | १६ |
व्यापार
संपादन२०११ मध्ये कतार(७५.५ अब्ज घ्न मीटर), मलेशिया(२५ अब्ज घन मीटर) आणि इंडोनेशिया(२१.४ अब्ज घन मीटर) हे द्रवरूप नैसर्गिक वायूचे तीन सर्वात मोठे निर्यातदार देश होते. २००६ मध्ये कतार हा द्रवीकृत नैसर्गिक वायूचा जगातला सगळ्यात मोठा निर्यातदार देश बनला. २०१२ पर्यंत, एकूण जागतिक निर्यातीपैकी २५ टक्के वाटा एकट्या कतारचा होता.
आयात
संपादनजपान, दक्षिण कोरिया, स्पेन, फ्रांस, इटली आणि तैवान हे देश सर्वात जास्त द्रवीकृत नैसर्गिक वायूची आयात करतात. २००५ मध्ये जपानने ५.८६ कोटी टन द्रनैवाची आयात केली. ती त्या वर्षीच्या एकूण जागतिक व्यापाराच्या ३० टक्के होती. तसेच २००५ मध्ये दक्षिणकोरियाने २.२ कोटी टन आणि २००४ मध्ये तैवानने ६८ लाख टन द्रनैवाची आयात केली.