दोघी (चित्रपट)
दोघी (इंग्रजी मधील टू सिस्टर्स) हा १९९५ मधील भारतीय मराठी चित्रपट असून या चित्रपट निर्माते सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि दूरदर्शनच्या सहकार्याने भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने निर्मित केलेले आहे. १९९५ मध्ये ४३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात चित्रपटाने तीन पुरस्कार जिंकले; सामाजिक विषयांवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका आणि उत्तरा बावकर यांना विशेष उल्लेख पुरस्कार. १९९६ मध्ये ३२व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातील नऊ पुरस्कार मिळाले.[१][२]
भारतीय चित्रपट | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार | |||
दिग्दर्शक |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
कथानक
संपादनदोघी बहिणींपैकी मोठी, गौरीचे (रेणुका दफ्तरदार) लग्न आहे आणि घरात उत्सवाचे वातावरण आहे. गावातले वडीलधारे तिला वर येण्यापूर्वीच मंदिरात जाउन दर्शन घेण्याचा सल्ला देतात आणि म्हणूनच तिची लहान बहिण कृष्णा (सोनाली कुलकर्णी) आणि काका (सदाशिव अमरापूरकर) तिच्यासोबत असतात. परत जाताना काकांना वर्तमानपत्रात लक्षात येते की गावात येताना वराच्या कुटुंबाची प्राणघातक दुर्घटना झाली होती. गौरी आणि कृष्णाचे वडिलांना (सूर्यकांत मंधारे) धक्कादायक बातमीनंतर अर्धांगवायू होतो. सर्व ग्रामस्थ गौरीला वाईट शकुन म्हणून दूर ठेवतात. लवकरच, कुटुंबास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या उजाड जमिनीच्या तुकड्यावर शेती करून काही पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा काहीही निष्पन्न होत नाही तेव्हा त्यांची आई (उत्तरा बावकर) काकांना गौरीला नोकरीसाठी घेऊन जाण्यासाठी विनंती करते. सुरुवातीला संकोच करणारे काका मनाची खात्री पटवतात पण भविष्यात गौरीच्या ठिकाणाबद्दल आईला आणखी प्रश्न विचारू नका अशी आईला विनंती करतात.
काका गौरीला वेश्या व्यवसायात घालतात आणि ती दरमहा तिच्या कुटुंबियांना पैसे पाठवायला लागतात. कुटुंबाची परिस्थिती अधिक चांगल्या होतात आणि काका कृष्णाला एक स्वयंसेवी संस्थेत काम करणारे तरुण आदर्शवादी शेष वाघमारेचे (अभय कुलकर्णी) लग्नाचे स्थळ घेउन येतात. कृष्णाच्या लग्नासाठी गौरी गावाला भेट देते परंतु गौरीच्या दुर्दैवी विवाह घटनेमुळे आणि पैसे कमावण्याच्या पद्धतीमुळे त्यांची आई तिला कोणत्याही कार्यात भाग घेऊ देत नाही. कृष्णाला जेव्हा हे कळते तेव्हा ती त्यांच्या आईला प्रश्न विचारते आणि तिला गौरीची खात्री पटवून देते. जेव्हा गौरीने लग्न व गाव सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शेषचा कार्यकर्ता मित्र निवृत्ती कांबळे (सुनील सुकथणकर) तिचा भूतकाळ माहित असूनही तिला लग्नासाठी प्रस्तावित ठेवतो. मुंबईतील वेश्या म्हणून तिच्या आयुष्यात कधीच परतू नये म्हणून गौरी गावातच राहते.
निर्माण
संपादनरेणुका दफ्तरदार व सोनाली कुलकर्णी ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावतात. बाकी सहकलाकार आहेत: सदाशिव अमरापूरकर (काका), सूर्यकांत मंधारे (वडील), उत्तरा बावकर (आई) व मधू कांबीकर (काकू). सुमित्रा भावे आणी सुनील सुकथणकर ह्या जोडीचा एकत्रित हा पहिला चित्रपट आहे. आधी त्यांनी लघुपट केले होते. उमेश विनायक कुलकर्णीने ह्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शन केले आहे.[३]
पुरस्कार
संपादन१९९५ मध्ये ४३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात या चित्रपटाने तीन पुरस्कार जिंकले. चित्रपटाला इतर सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. "भुई भेगाली खोल" या सुमधुर आणि हृदयस्पर्शी गाण्यासाठी अंजली मराठे यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री उत्तरा बाओकर हिने विशेष उल्लेख पुरस्कार जिंकला.
संदर्भ
संपादन- ^ "43rd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. p. 16–17, 36–37, 82–83. 6 March 2012 रोजी पाहिले.
- ^ "Sonali Kulkarni's take on life to be unveiled today". The Indian Express. Mumbai. 2 March 2010. 5 May 2017 रोजी पाहिले.
- ^ "Faces of the future". India Today. 16 January 2009. 8 May 2017 रोजी पाहिले.