सुमित्रा भावे (१२ जानेवारी, १९४३: पुणे, महाराष्ट्र - १९ एप्रिल २०२१ पुणे[१]) या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे १४ चित्रपट, ५०हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांवर काम केले. या सर्व मालिकांचे लिखाण भावेंचे आहे. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत.

The Directors Sumitra Bhave & Sunil Sukthankar and Actress Iravathi Harshe of the film KAASAV, at the presentation, during the 48th International Film Festival of India (IFFI-2017), in Panaji, Goa on November 26, 2017.jpg
Sumitra Bhave and Sunil Sukthankar of the film Badha addressing a press conference at Black Box ,Kala Academy on the occasion of 37th International Film Festival of India (IFFI-2006) in Panaji, Goa on December 2, 2006.jpg

भावे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजतून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशासन आणि समाजशास्त्र या विषयात दोन वेळा एम.ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामकल्याण विषयाची पदविका आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्यूनिटी एड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या.

भावे यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या आहेत. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या.

त्यांनी सुनील सुकथनकर यांच्याबरोबर अनेक मराठी चित्रपटांवर काम केले आहे.

दिग्दर्शित केलेले चित्रपटसंपादन करा

 • अस्तु
 • एक कप च्या
 • कासव
 • घो मला असला हवा
 • जिंदगी जिंदाबाद (हिंदी)
 • दहावी फ
 • देवराई
 • दोघी
 • नितळ
 • फिर जिंदगी (हिंदी लघुपट)
 • बाधा
 • बेवक्त बारिश (हिंदी लघुपट)
 • मोर देखने जंगल में (हिंदी माहितीवजा कथापट)
 • वास्तुपुरुष
 • संहिता
 • हा भारत माझा
 • दिठी

दिग्दर्शित केलेले मराठी लघुपटसंपादन करा

 • बाई
 • पाणी

पुरस्कारसंपादन करा

 • पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबच्या २६ वाढदिवसानिमित्त दिला गेलेला पुणे प्राईड पुरस्कार (डिसेंबर २०१७)
 • शाहूमहाराज जीवनगौरव पुरस्कार (एप्रिल २०१९)
 • लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार (२०२०)[२]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

 1. ^ "ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन". Loksatta. 2021-04-20. 2021-04-20 रोजी पाहिले.
 2. ^ "सुमित्रा भावे यांना 'लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव'". Loksatta. 2020-12-06. 2021-04-20 रोजी पाहिले.