दीपशिखा देशमुख
दीपशिखा देशमुख (विवाहपूर्व: भगनानी ) ह्या एक भारतीय चित्रपट निर्माता आहे ज्या हिंदी चित्रपटसृष्टीत काम करतात. चित्रपट निर्माता वासू भगनानी आणि पूजा भगनानी यांच्या त्या कन्या असून अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी यांची बहीण आहेत.[१] तिने पूजा एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. २०२० मध्ये, तिने जवानी जानेमन आणि त्याच नावाने १९९५ च्या कल्ट क्लासिक 'कुली नंबर-१'चा रिमेक तयार केला. दीपशिखा 'लव्ह ऑर्गॅनिकली' या ऑरगॅनिक स्किनकेअर ब्रँडचीही संस्थापक आहे.
दीपशिखा देशमुख | |
---|---|
दीपशिखा देशमुख | |
जन्म | कोलकाता, पश्चिम बंगाल |
निवासस्थान | मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
जोडीदार | |
अपत्ये | २ |
वडील | वासू भगनानी |
नातेवाईक | जॅकी भगनानी (भाऊ) |
संकेतस्थळ poojaentertainmentandfilms |
दीपशिखा देशमुख ने विलासराव देशमुख यांचे पुत्र तथा आमदार धिरज देशमुख यांच्याशी २७ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत.[२][३][४]
चित्रपट सूची
संपादननिर्मिती
संपादनवर्ष | चित्रपट |
---|---|
२०१६ | सरबजीत |
२०१६ | मदारी |
२०१६ | तुतक तुतक तुतिया |
२०१७ | सर्वन |
२०१८ | वेल कम टू न्यू यॉर्क |
२०१८ | दिल जंगली |
२९२० | जवानी जानेमन |
२०२० | कूली नंबर १ |
२०२१ | बेल बॉटम |
२०२२ | कठपुतली |
२०२२ | गनपथ |
संदर्भ
संपादन- ^ Bureau, ABP News (21 February 2020). "Jackky Bhagnani & Deepshikha Deshmukh's 'Carbon: The Story Of Tomorrow' Wins Best Short Film Award". news.abplive.com.
- ^ "Dheeraj Deshmukh and Deepshikha Wedding Ceremony Photos - FilmiBeat". Filmibeat. 4 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Dhiraj V Deshmukh and Honey Bhagnani with their children during Aaradhya Bachchan's birthday party held at Pratiksha in Mumbai - Photogallery". photogallery.indiatimes.com. 17 November 2015. 4 June 2021 रोजी पाहिले.
- ^ "Actor Riteish Deshmukh raises poll fever, turns crowd puller for this Brothers in Latur". द टाइम्स ऑफ इंडिया. 12 October 2019. 25 October 2019 रोजी पाहिले.