दालन:इतिहास/इतिहासकार/1
लिव्ही टायटस हा एक रोमन इतिहासकार होता. इटलीतील पेटेव्हिअम (सध्याचे पॅड्युआ) या गावी इ.स.पू. ५९ साली झाला त्याचा जन्म होता. त्याचे सर्व आयुष्य रोममध्येच गेले. त्याने रोमन संस्कृतीची तीन महत्वाची स्थित्यंतरे रोमन साम्राज्याचा र्हास, रोमन साम्राज्याची स्थापना व ऑगस्टसची वैभवशाली कारकिर्द अनुभवली. त्याने हिस्ट्री ऑफ रोम फ्रॉम इट्स फाऊंडेशन हा ग्रंथ लहिला. रोम नगरीच्या स्थापनेपासून ते सम्राट टायबीअरिअस याचा भाऊ ड्रसस याच्या मृत्यूपर्यंत तपशीलवार माहिती दिलेली आाहे. रोमच्या इतिहासाचे १४२ खंड त्याने लिहिले. रोमच्या स्थापनेपासून इ.स. पूर्व १६७ पर्यंतचा इतिहास त्याच्यामुळे उपलब्ध आहे. रोमचे प्रजासत्ताक धुळीस का मिळाले याचीही चर्चा त्याने या ग्रंथात केली आहे. समृदद्धीमुळे आलेली हाव व सुखलोलुपतेमुळे आलेले कामस्वातंत्र्य हे रोमनांचे दुर्गुणही लिव्ही टायटसने या ग्रंथात दाखवून दिले आहेत. लिव्हीच्या या ग्रंथाची भाषांतरे लॅटिनमधून जर्मन, स्विडीश, फ्रेंच, इटालिअन, रूमानिअन इत्यादी भाषात झालेली आहेत.