दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

दर्यापूर विधानसभा मतदारसंघ - ४० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दर्यापूर मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अंजनगांव सूर्जी ही दोन तालुके आणि अचलपूर तालुक्यातील रासेगांव हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. दर्यापूर हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बळवंत बसवंत वानखडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

दर्यापूर विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • दर्यापूर तालुका
  • अंजनगांव सूर्जी तालुका
  • अचलपूर तालुका : रासेगांव महसूल मंडळ

दर्यापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार पक्ष
मध्य प्रदेश राज्य (१९५२-१९५६)
१९५२[n १] कोकिला जगन्नाथ गावंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
किसन नारायण खंदारे
बॉम्बे राज्य (१९५६-१९६०)
१९५७[n १] किसन नारायण खंदारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नारायण उत्तम देशमुख
महाराष्ट्र राज्य (१९६० पासून)
१९६२ जगन्नाथ देवराव पाटील भारतीय रिपब्लिकन पक्ष
१९६७ नारायण उत्तम देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९७२ कोकिला जगन्नाथ गावंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)
१९७८ शंकर कृष्ण बोबडे अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक
१९८० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
१९८५ रावसाहेब पांडुरंग हडोळे
१९९० प्रकाश गुणवंतराव भारसाकले शिवसेना
१९९५
१९९९
२००४
२००५ ^ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ अभिजित आनंदराव अडसूळ शिवसेना
२०१४ रमेश गणपतराव बुंदिले भारतीय जनता पक्ष
२०१९ बळवंत बसवंत वानखेडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
  • ^ - पोट-निवडणूक

निवडणूक निकाल

संपादन

विजयी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).

नोंदी

संपादन
  1. ^ a b द्विसदस्यीय जागा.

बाह्य दुवे

संपादन