साउथ डकोटा

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील राज्य
(दक्षिण डाकोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

साउथ डकोटा (इंग्लिश: South Dakota) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या उत्तर भागात वसलेल्या ह्या राज्यामध्ये तुरळक लोकवस्ती आहे. साउथ डकोटा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील १७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४६व्या क्रमांकाचे राज्य आहे.

साउथ डकोटा
South Dakota
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द माउंट रशमोर स्टेट (The Mount Rushmore State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी पियेर
मोठे शहर सू फॉल्स
क्षेत्रफळ  अमेरिकेत १७वा क्रमांक
 - एकूण १,९९,९०५ किमी² 
  - रुंदी ३४० किमी 
  - लांबी ६१० किमी 
 - % पाणी १३.५
लोकसंख्या  अमेरिकेत ४६वा क्रमांक
 - एकूण ८,१४,१८० (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४.०५/किमी² (अमेरिकेत ४६वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २ नोव्हेंबर १८८९ (४०वा क्रमांक)
संक्षेप   US-SD
संकेतस्थळ www.sd.gov

साउथ डकोटाच्या दक्षिणेला नेब्रास्का, पश्चिमेला वायोमिंग, वायव्येला मोंटाना, पूर्वेला मिनेसोटा, आग्नेयेला आयोवा तर उत्तरेला नॉर्थ डकोटा ही राज्ये आहेत. पियेर ही साउथ डकोटाची राजधानी असून सू फॉल्स हे सर्वात मोठे शहर आहे.

गॅलरी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: