थियोडोर रूझवेल्ट

अमेरिकन राजकारणी
(थिओडोर रुझवेल्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

थियोडोर रूझवेल्ट (इंग्लिश:Theodore Roosevelt) (ऑक्टोबर २७, इ.स. १८५८:न्यू यॉर्क - जानेवारी ६, इ.स. १९१९:ऑइस्टर बे, न्यू यॉर्क) हे अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष होते.

थियोडोर रूझवेल्ट

सही थियोडोर रूझवेल्टयांची सही

परिचय

संपादन

थियोडोर रूझवेल्ट हे मूळचे जमीनदार होते. संशोधक आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना शिकारीचा छंद होता. राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आहे. थियोडोर रूझवेल्ट हे न्यू यॉर्कचे राज्यपाल म्हणून काम करत असतानाच अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. विल्यम मॅक्कीन्लेंच्या हत्येनंतर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

कामगिरी

संपादन

इ.स. १८९८ साली स्पेनबरोबर अमेरिकेच्या झालेल्या युद्धात थियोडोर रूझवेल्ट यांनी रफ रायडर्स नावाची पलटण तयार केली होती. रशिया-जपान युद्ध थांबवण्यात थियोडोर रूझवेल्ट यांनी केलेली कामगिरी विशेष महत्त्वाची मानली जाते. या कामगिरीच्या सन्मानार्थ इ.स. १९०५ सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

बाह्य दुवे

संपादन
  • "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2010-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ५, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
  • "थियोडोर रूझवेल्ट: अ रिसोर्स गाइड (थियोडोर रूझवेल्ट: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)