रफ रायडर्स हे १ल्या युनायटेड स्टेट्स स्वयंसेवी घोडदळाला दिलेले टोपण नाव होते. या रेजिमेंटने इ.स. १८९८मध्ये स्पॅनिश अमेरिकन युद्धात इतर दोन स्वयंसेवी रेजिमेंटबरोबर भाग घेतला. या पलटणीस वूड्स वीयरी वॉकर्स असेही नाव होते. ही पलटण घोडदळाची असली तरी अनेकदा त्यातील सैनिक पायउतार होउन लढत व कूच करीत. यामुळे व पलटणीचा सेनापती कर्नल लिओनार्ड वूड याच्या नावावरून हे टोपणनाव दिले गेले.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट राजकारणात शिरण्याआधी या रेजिमेंटमध्ये कर्नल पदावर वूडचा उपसेनापती होता.