गौरी देशपांडे
गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते.
गौरी देशपांडे | |
---|---|
जन्म | फेब्रुवारी ११, १९४२ |
मृत्यू | मार्च १, २००३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
विषय | व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवादी साहित्य |
वडील | दिनकर उर्फ डी. डी. कर्वे |
आई | इरावती कर्वे |
प्रकाशित साहित्य
संपादनगौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.'[२] १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.[१]
तेरुओ आणि कांही दूरपर्यंत
संपादन- किंमत: १५० रु.; पृष्ठे: १५०
- प्रकाशन: १९८५ (पहिली आवृत्ती); २००६ (दुसरी आवृत्ती)
- प्रकाशक: मौज प्रकाशन गृह, गिरगाव, मुंबई- ०४
- ISBN 81-7486-575-6
गौरी देशपांडे यांनी लिहिलेली/मराठी-इंग्रजीत अनुवादित केलेली पुस्तके
संपादन- अरेबियन नाइट्स(एक हजार रात्री आणि एक रात्र), (The Arabian Nightsचा १६ खंडी मराठी अनुवाद).
- आहे हे असं आहे,१९८६
- उत्खनन,२००२
- एकेक पान गळावया,१९८०
- गोफ,१९९९
- Dread Departure, The (seagull), (इंग्रजी, वर्ष?)
- तेरुओ आणि कांही दूरपर्यंत,१९८५
- 'दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’,१९८९
- निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग!',१९८७
- Between Births (इंग्रजी काव्यसंग्रह), १९६८
- Beyond The Slaughter House, (इंग्रजी, वर्ष?)
- मुक्काम,१९९२
- The Lackadaisical Sweeper: Short Stories, (इंग्रजी, १९७०)
- Lost love, (इंग्रजी, १९७०)
- ...and Pine for What Is Not (सुनीता देशपांडे यांच्या 'आहे मनोहर तरी...' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद, १९९५)
- विंचुर्णीचे धडे,१९९६
- सात युगोस्लाव लघुकथा (अनुवादित)
दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेल्या कथा
संपादन- दार; मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९४
- धरलं तर चावतं; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६
- भिजत भिजत कोळी; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३
- रोवळी; मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९३
- हिशेब; (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१
गौरी देशपांडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
संपादन- गौरी मनातली, २००५
- कथा गौरीची, २००८
- महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल), १९९९ - या पुस्तकात मंगला आठल्येकर यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे, र. धों कर्वे आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील लेखकांच्या स्त्री-विषयक कार्याचा आलेख मांडला आहे.