तिनसुकिया

(तिन्सुकिया या पानावरून पुनर्निर्देशित)

तिनसुकिया भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,४४८ होती. हे शहर तिनसुकिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. आसामच्या भाषेत तिनिसुकिया म्हणजे तीन कोपरे होय. त्या भागात असणाऱ्या त्रिकोणी तळ्यावरून त्या गावाला तिनिसुकिया नाव पडले असे तेथील जाणकार सांगतात. तिनिसुकियाचा बराचसा भाग हा बंगाली आहे. तिनिसुकिया हे पूर्व आसाम मधील एक महत्त्वाचे शहर समजले जाते. तेथे गावाबाहेर दूरवर पसरलेले चहाचे मळे पहायला मिळतात.[]

  ?तिनसुकिया

आसाम • भारत
—  नगर  —
Map

२७° २९′ २१″ N, ९५° २१′ ३६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा तिनसुकिया
लोकसंख्या ९९,४४८ (२०११)
कोड
पिन कोड

• 786125
संकेतस्थळ: [१]
शहरातील तिनकुनिया पुखरी हे त्रिकोणी तळे

दळणवळण व सुविधा

संपादन

राज्यातील व इतर राज्यातील भागांशी रस्तेलोहमार्गाने थेट संपर्क आहे. तिनिसुकिया व न्यू तिनिसुकिया अशी दोन रेल्वे स्थानके या शहरात आहेत. दिल्लीशी रेल्वेमार्गाने थेट वाहतूक सोय आहे. अरुणाचल प्रदेशातीलाही काही भागांशी दळणवळणाची सुविधा आहे. येथे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे. तिनिसुकिया शहरातील वातावरण, हवामान हे मानवानुकूल आहे. तेथे शाळा-महाविद्यालये यांच्या चांगल्या सोयी आहेत. अन्न सहज व माफक किमतीत मिळते. पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसारख्या इतर सोयीसुविधाही आहेत.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b बिनीवाले, अविनाश (२००८). पूर्वांचल. विजयानगर, पुणे ४११ ०३०: कॉन्टिनेन्टल प्रकाशन विजयानगर,पुणे ४११ ०३०. pp. २०१.CS1 maint: location (link)