तयप्पा हरी सोनवणे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून भारतीय संसदेच्या खालच्या सभागृहात लोकसभेवर निवडून गेले.[][]

ते कक्कया समाजाचे पहिले वकीलखासदार. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे या गावी झाला. त्यांना मराठी, इंग्रजी, फ्रेंच भाषा येत. ते अर्थशास्त्रराज्यशास्त्र घेऊन बी.ए. व नंतर नोकरी करत असताना वकील झाले. मुंबईत वकिली शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन मिळाले. मुंबई महापालीकेमध्ये अधिकारी होते व नंतर धारावी मतदारसंघातून महापालिकेचे सदस्य झाले. २६ जानेवारी १९५० रोजी अस्थित्वात आलेल्या पहिल्या हंगामी लोकसभेत खासदार होते. १९५७ साली सोलापूर व १९६२ साली पंढरपूर मतदारसंघातून निवडून येऊन ते सलग १७ वर्षे खासदार राहिले. सन १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) २३व्या आमसभेत त्यांनी भारताच्या वतीने तिसरे भाषण केले. ते दिल्ली महापालिकेचे जन्मदातेही आहेत. लोकसभेत अनेकवेळा सभापतीउपसभापती यांच्या गैरहजेरीत हंगामी सभापतीपद म्हणून काम पाहिले.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Brothers' proxy battle in Pandharpur". Rediff. 19 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "The Gazette of India" (PDF). MINISTRY OF LAW. 5 April 1957. 19 January 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "The Gazette of India" (PDF). MINISTRY OF LAW. 5 April 1957. 19 January 2019 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन