टोराँटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ

(टोराँटो-पीयरसन आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Toronto Pearson International Airport) (आहसंवि: YYZआप्रविको: CYYZ) हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान लेस्टर बी. पियरसन ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडाचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ
आहसंवि: YYZआप्रविको: CYYZ
YYZ is located in ऑन्टारियो
YYZ
YYZ
ऑन्टारियोमधील स्थान
माहिती
मालक ट्रान्सपोर्ट कॅनडा
कोण्या शहरास सेवा टोरॉंटो
स्थळ मिसिसागा, ऑन्टारियो
हब एर कॅनडा
फेडेक्स एक्सप्रेस
समुद्रसपाटीपासून उंची ५६९ फू / १७३ मी
गुणक (भौगोलिक) 43°40′36″N 79°37′50″W / 43.67667°N 79.63056°W / 43.67667; -79.63056
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
05/23 ११,१२० डांबरी/कॉंक्रीट
15L/33R ११,०५० डांबरी
06L/24R ९,६९७ डांबरी
06R/24L ९,००० डांबरी
15R/33L ९,०८८ डांबरी
सांख्यिकी (२०१६)
एकूण प्रवासी ४,४३,३५,१९८
विमाने ४,५६,५३६
स्रोत:
Environment Canada[१]
Transport Canada[२]
Movements from Statistics Canada[३]
Passengers and Movements from Airports Council International[४]
येथे उतरणारे ब्रिटिश एरवेजचे बोइंग ७८७ विमान

२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ उत्तर अमेरिकेमध्ये न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते.

बाह्य दुवे संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Synoptic/Metstat Station Information". Archived from the original on 2012-07-07. 2011-05-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Airport Divestiture Status Report". Tc.gc.ca. January 12, 2011. 2011-02-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Total aircraft movements by class of operation — NAV CANADA towers". Statcan.gc.ca. 2013-10-04 रोजी पाहिले.
  4. ^ "Airport Traffic Reports". Aci-na.org. Archived from the original on 2013-11-01. 2013-04-14 रोजी पाहिले.