मुख्य मेनू उघडा

टॉम क्रूझ (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) हा एक अमेरिकन सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार तर दोन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत.

टॉम क्रूझ
जन्म ३ जुलै, १९६२ (1962-07-03) (वय: ५७)
सिरॅक्युज, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९८१ - चालू
पत्नी मिमी रॉजर्स (१९८७-९०)
निकोल किडमन (१९९०-२००१)
केटी होम्स (२००६-१२)
धर्म विज्ञानशास्त्र

टॉम क्रूझने आजवर टॉप गन (१९८६), अ फ्यू गूड मेन (१९९४)), जेरी मॅग्वायर (१९९६), मॅग्नोलिया (१९९९), द लास्ट सामुराई (२००५) इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. १९९६ पासून तो मिशन: इम्पॉसिबल ह्या शृंखलेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या शृंखलेमधील मिशन: इम्पॉसिबल, मिशन: इम्पॉसिबल २, मिशन: इम्पॉसिबल ३‎, मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉलमिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन ह्या पाचही चित्रपटांमध्ये तो इथन हंट नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत चमकला आहे.

बाह्य दुवेसंपादन करा