निकोल किडमन

ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री.

निकोल मेरी किडमन (इंग्लिश: Nicole Mary Kidman; २० जून १९६७) ही एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८३ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी किडमन १९८९ सालच्या डेड काम ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या मोलिं रूज ह्या चित्रपटासाठी किडमनला ऑस्कर नामांकन तर पुढील वर्षामधील द आवर्स ह्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

निकोल किडमन
स्थानिक नाव Nicole Kidman
जन्म निकोल मेरी किडमन
२० जून, १९६७ (1967-06-20) (वय: ५७)
होनोलुलु, हवाई
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलियन
नागरिकत्व ऑस्ट्रेलियन, अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री, गायिका, निर्माती
कारकीर्दीचा काळ १९८३ - चालू
पती टॉम क्रूझ (१९९० - २००१)
अधिकृत संकेतस्थळ nicolekidmanofficial.com

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: