एलएटीएएम एरलाइन्स ब्राझील

(टॅम एरलाइन्स या पानावरून पुनर्निर्देशित)

टी.ए.एम. एरलाइन्स (पोर्तुगीज: TAM Linhas Aéreas) ही लॅटिन अमेरिकेतील ब्राझील ह्या देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७६ साली स्थापन झालेली टी.ए.एम. एरलाइन्स २०१२ मध्ये चिलीच्या एल.ए.एन. एरलाइन्ससोबत एकत्रित करण्यात आली. टी.ए.एम. एरलाइन्सचे मुख्यालय साओ पाउलो येथे असून २०१४ साली तिचा ब्राझीलमधील देशांतर्गत प्रवासी वाहतूकीमध्ये ३८.१ टक्के तर आंतरराष्ट्रीय वाहतूकीमध्ये ७८.८ टक्के वाटा होता. ३१ मार्च २१४ पासून टी.ए.एम. एरलाइन्स वनवर्ल्ड ह्या संघटनेचा सदस्य आहे.

टी.ए.एम. एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
JJ
आय.सी.ए.ओ.
TAM
कॉलसाईन
TAM
स्थापना १९७६
हब साओ पाउलो–ग्वारूलोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
रियो दि जानेरो–गालेयाओ आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर TAM Fidelidade
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या १६६
गंतव्यस्थाने ६३
ब्रीदवाक्य Estou feliz que você veio
पालक कंपनी लाताम समूह
मुख्यालय साओ पाउलो, ब्राझील
सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळारून उड्डाण केलेले टी.ए.एम. एरलाइन्सचे एअरबस ए३२० विमान

बाह्य दुवे

संपादन