सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ (स्पॅनिश: Aeropuerto Internacional de Maiquetía "Simón Bolívar") (आहसंवि: CCS, आप्रविको: SVMI) हा व्हेनेझुएला देशाच्या काराकास शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. व्हेनेझुएलामधील सर्वात वर्दळीचा असलेला हा विमानतळ काराकासच्या २१ किमी वायव्येस स्थित असून व्हेनेझुएलाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी कॉन्व्हियासाचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे. ह्या विमानतळाला व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्राध्यक्ष सिमोन बॉलिव्हार ह्याचे नाव देण्यात आले आहे.
सिमोन बॉलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळ Aeropuerto Internacional de Maiquetía "Simón Bolívar" | |||
---|---|---|---|
आहसंवि: CCS – आप्रविको: SVMI
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | काराकास | ||
स्थळ | मैक्वेशिया, व्हेनेझुएला | ||
हब | कॉन्व्हियासा | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २३५ फू / ७२ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 10°36′11″N 66°59′26″W / 10.60306°N 66.99056°W | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
10/28 | 11,483 | 3,610 | डांबरी |
09/27 | 9,930 | 3,270 | डांबरी |
सांख्यिकी (२०१४) | |||
प्रवासी | १,७८,२२,२२५ | ||
विमाने | १,४०,९८० | ||
स्रोत: [१] |
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत